टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ३० – दिनांक 13 मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दोन मे पर्यंत चोपडा विधानसभा मतदारसंघातील 3,22,228 मतदारांना घरबसल्या त्यांची मतदार चिठ्ठी मिळावी म्हणून 319 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे. चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी त्यांना मुदतीत मतदार चिठ्ठी वाटप पूर्ण करण्याचे सुचित केले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे आदी हजर होते.
यापूर्वी मतदार चिठ्ठीवर मतदाराचे फोटो होते मात्र यावेळेस त्या ठिकाणी बारकोड देण्यात आलेले आहे, हा बारकोड स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी मतदाराचा संपूर्ण तपशील दिसणार आहे तसेच मतदारसंघाच्या पाठीमागील बाजूवर मतदान केंद्राचा मार्ग देखील दर्शविण्यात आलेला आहे.
यावेळी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व साहित्याचे वाटप साहित्य नोडल अधिकारी रविंद्र माळी यांनी केले. तसेच सर्व केंद्रस्तरीय अधिकारी यांना शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. घरोघरी मतदार चिठ्ठीचे वाटप करताना घरातील सज्ञान व्यक्तीच्या हाती मतदार चिठ्ठी देण्यात यावी तसेच कोणत्याही स्वरूपाची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदार चिठ्ठी दिल्याबाबत नोंद वहीवर सही घ्यावी. तसेच शिल्लक मतदार चिठ्ठी २ मे नंतर अनुपस्थित, स्थलांतरित व मयत मतदारांच्या याद्यांसह तहसिल कार्यालयात जमा करण्यात यावे.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...