टिम लोकप्रवाह, चोपडा/ अमळनेर दिनांक ०४ मे – मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षाची दुहेरी शिक्षा आणि ५० हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्या. पी. आर. चौधरी यांनी शुक्रवारी दिनांक ०३ मे रोजी हा निकाल दिला. ज्ञानेश्वर रामदास कोळी (वय ४५ , रा. चुंचाळे ता. चोपडा ) असे या आरोपीचे नांव आहे.
मार्च २०२० मध्ये मुलीचे आई – वडील घरी नसतांना आरोपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. परत चार दिवसांनी मुलीचे आई-वडील व भाऊ शेतात गेले असतांना आरोपीने पुन्हा अत्याचार केला. तीन – चार महिन्यांनी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात दाखविले असता ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यांनतर पिडीता व तिची आई हे दोघे चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे जावुन व त्यानंतर बालकल्याण समिती, जळगांव येथे पिडीतेचे समुउपदेशन करण्यात आले. व सदर घटनाकम लक्षात घेवुन चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे पिडीतेच्या आईने फिर्याद दिली होती. मा. न्यायालयात आरोपी विरुध्द भा.दं. वि. कलम कलम 376(1) (A),376 (3),506 व बाल लैंगिक आत्याचार संरक्षण कायदा 2012 चे कलम 3(a) 4, 5(01) (2), 6. प्रमाणे दोषारोपपत्र ठेवण्यात आले. सदर कामी मा. जिल्हा न्यायाधीश 2 पी.आर.चौधरी यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले. त्यात सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल यांनी कामकाज पाहिले. सदर खटल्यात एकुण 11 साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यातील सरकार पक्षातर्फे फिर्यादी व पिडीता तसेच वैदयकिय अधिकारी चोपडा व वैदयकिय अधिकारी जळगांव व तपासणी अधिकारी संदिप आराक यांनी तपास केला. तदनंतर मा. न्यायालयात सदर गुन्हयातील महत्त्वाचे साक्षीदार सरकारी वकील किशोर बागुल यांनी तपासले. त्यात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर डि.एन.ए. स्पॅम्पल रिपोर्ट आल्यावर ते आरोपीताचे डि.एन.ए. असल्याचे नाशिक वैज्ञानिक विभाग यांनी अहवाल सादर केला. सदर अहवाल व इतर साक्षीदारांच्या साक्ष मा. न्यायालयाने ग्राहय धरुन आरोपीतास सदर खटल्यात कलम 3(a) 4, 5(1) (2), 6. प्रमाणे दोषी घरले व कलम 3(a) शिक्षा कलम 4. प्रमाणे 20 वर्षे शिक्षा तसेच 5(1) (2) शिक्षा कलम 6 प्रमाणे 20 वर्षे शिक्षा व रक्कम रुपये 50.000/- रुपये दंड सदर दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मा. न्यायालयाने सदर खटल्यात पिडीतेच्या भवितव्याचा विचार करुन पिडीतेस सदर दंडाची रक्कम रुपये 50,000/- तिचे मानसिक उदरनिर्वाहा करीता देण्याचे आदेश केले असुन पुन्हा जिल्हा विधी सेवा समिती जळगांव यांचे कडेस पिडीतेस झालेल्या अत्याचारामुळे मानसिक व शरिरिक त्रास करीता विधीसेवासमितीकडे पिडीता फंड मागण्याबाबद देखील आदेश करुन त्याबाबत पिडीतेस देखील फंड मिळण्याकरीता न्यायानिर्णयाची प्रत सरकारी वकील किशोर बागुल यांचेमार्फत पिडीतेस देण्याचे आदेशीत केले आहे. जेणेकरुन पिडीतेस झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी शासनकडुन निर्भया फंडमधुन मागणी करता येईल.
सदर खटल्याकामी तपासणी अधिकारी संदिप आराक, पैरवी अधिकारी एएसआय. उदयसिंग साळुंके, पोहेकॉ. हिरालाल पाटील, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोकॉ. नितीन दिलीप कापडणे, पोकॉ.आकाश पाटील व चोपडा ग्रामीण पोलीस केसवाच म्हणून पोकॉ. राहुल रणधीर यांनी काम पाहीले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...