Thursday, June 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वर्धा येथे मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 24, 2024
in विदर्भ, वर्धा जिल्हा, शासकीय
0
वर्धा येथे मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. २४ – येत्या 26 एप्रिलला होणाऱ्या 08 वर्धा लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे तसेच मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, क्रीडा अधिकारी अनील निमगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायकल रॕलीप्रसंगी सहभागी सर्व अधिकारी वर्ग व इतर

मतदारांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवावी व लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा. युवा वर्गाने विशेषत: नवमतदारांनी जे प्रथमच मतदान करणार आहे त्यांनी उत्साहामध्ये मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्हा क्रिडा संकुल येथून सायकल रॅलीची सुरूवात झाली. महात्मा गांधी पुतळा, विश्रामगृह, आरती चौक, धूनिवाले मठ, आर्वी नाका, बॅचलर रोड, शास्त्री चौक, बजाज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार (निवडणूक) अतुल रासपायले यांनी केले.

Post Views: 348
Previous Post

होम वोटिंगवर असणार कॅमेराची नजर – गजेंद्र पाटोळे

Next Post

आता मतदारांना घरबसल्या मिळणार वोटर स्लिप !!

Next Post
आता मतदारांना घरबसल्या मिळणार वोटर स्लिप !!

आता मतदारांना घरबसल्या मिळणार वोटर स्लिप !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us