टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 14 – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
पुर्वी पवन अग्रवाल ही विद्यार्थिनी ९४% गुण प्राप्त करून शाळेत प्रथम आली आहे. दिव्य हितेश जैन (९१.६०%), राजवीर प्रशांत पाटील (९१.२०%), स्पंदन उत्तम सोनकांबळे (९०.४०%), सेजल अजय कासट (८७.४०%), रोहित किशोर मराठे (८७%), प्रियांशू खंडेराव पाटील (८६.४%), मोहित भागवत पाटील (८६.४), मनीष भिकन शिरसाठ (८६.२%), अक्षय संदिप पाटील (८४.८%), देवांशू मनोज पाटील (८३.८%), मंदाश्री चंद्रकांत पाटील (८२.८%), हर्षदा प्रवीण बोरसे (८०.४%) व रिद्धिमा विजय सोनवणे (८०.२%) आदी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, शाळा समन्वयक निळकंठ सोनवणे, प्रा. दीनानाथ पाटील, विलास दारूंटे, मुख्याध्यापिका ममता न्याती, उप मुख्याध्यापक अमन पटेल आदींच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले.
गुणगौरव सोहळ्याप्रसंगी यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसह उपस्थित मान्यवर
मोहित भागवत पाटील या विद्यार्थ्याने संस्कृत या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचा देखील विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ममता न्याती, अमन पटेल, दीप्ती पाटील, विशाखा बडगुजर, जगदीश पाटील, वैभव मराठे, विशाल मराठे, शकील अहमद, भूषण बडगुजर आणि दिपाली पाटील आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पुर्वी पवन अग्रवाल या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले तर पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. उत्तम सोनकांबळे, प्रेमलता इंदरचंद टाटीया यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन अमन पटेल यांनी केले.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...