टिम लोकप्रवाह, वर्धा दि.19 – आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या आदेशावरून, प्रदेश सचिव डॉ. जाफरी, सोनु फटींग, प्रदेश संघटन मंत्री भुषण ढाकुलकर यांच्या मार्गदर्शनात व वर्धा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यात पक्षबांधणीचे कार्य धडाडीने सुरू असुन त्याच अनुषंगाने, पहेलानपुर येथे शाखेचे उदघाट्न करण्यात आले. सदर शाखाध्यक्ष पदी चंदु झाडे, उपाध्यक्ष पदी स्वप्नील ठेरे, सचिवपदी विजयराव मुडे, सहसचिव ओम झाडे, संघटन मंत्री साहिल कायते, सहसंघटन मंत्री आदित्य आडकिने, कोषाध्यक्ष प्रमोद झाडे व सदस्य म्हणुन अक्षय किरणाके, स्वप्नील हिवंज, गौरव किरनाके तसेच महिला आघाडी सदस्य म्हणुन अर्चना झाडे, वर्षा झाडे, पूजा झाडे आदींची सर्वानुमते निवड करून पहेलानपुर ग्राम शाखेचे थाटात स्थापना करण्यात आली.
शिवनगाव येथील आपचे युवा नेते सुरज कांबळे यांच्या पुढाकाराने पहेलानपुर येथे बैठकीचे आयोजन करून शाखा स्थापन करण्यात आल्यामुळे सुरज कांबळे यांचे युवा आघाडी उपाध्यक्ष सुर्या सोनोने यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी वर्धा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, युवा आघाडी वर्धा जिल्हाध्यक्ष अभिलाष डाहुले, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुर्या सोनोने, देऊळगाव ग्राम अध्यक्ष सुरेश कुमरे व गणेश वडतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी ग्रामस्थ मंडळीच्या वतीने नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.