Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयातील पिकलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना नॅट फाउंडेशनतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 19, 2024
in चोपडा, खेळ, शैक्षणिक
0
चोपडा महाविद्यालयातील पिकलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांना नॅट फाउंडेशनतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 19 : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयात नॅट फाउंडेशन, मुंबई व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पिकलबॉल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी हे तर प्रमुख अतिथी म्हणून नॅट फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी चेतन सनील, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ,  उपप्राचार्य ए. एन. बोरसे, रजिस्ट्रार डी. एम. पाटील व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक भूपेंद्र पोळ आदिंची उपस्थिती होती. याप्रसंगी नॅट फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे वर्षा चौधरी, सनी पाटील, अभिषेक वाघ, भूषण बाविस्कर, उज्वला गद्रे या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारून क्रीडाविषयक कामगिरीसाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
यावेळी स्नेहल पाटील, भूपेंद्र पोळ, रोहित पाटील, अंजली पोळ, जीनिशा क्षीरसागर या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पिकलबॉल स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना तसेच प्राध्यापकांना टी शर्ट देऊन नॅट फाउंडेशन, मुंबई व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चोपडा यांच्यातर्फे गौरविण्यात आले. याप्रसंगी अभिषेक वाघ, नर्मदानंद चौधरी, एलिना साळवी, कलश क्षीरसागर या विद्यार्थ्यांचा पिकलबॉल किट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नॅट फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी चेतन सनील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पिकल बॉल या खेळाला उज्वल भविष्य आहे. खेळाडूंनी हा खेळ नेहमी खेळावा व त्याचा सराव करावा. चोपड्यातील पिकलबॉल खेळाडू चमकदार कामगिरी करत आहे, ही अतिशय गौरवाची बाब आहे. चोपड्यासारख्या ग्रामीण भागात पिकलबॉल खेळासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा खेळाडूंनी फायदा घ्यायला हवा. आमच्या संस्थेतर्फे विविध सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित केले जाते तसेच चोपड्या सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूसाठी देखील आर्थिक योगदान देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
    यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सुर्यवंशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक भूपेंद्र पोळ यांनी चोपड्यासारख्या भागात पिकलबॉल हा खेळ प्रथमतः आणला व त्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले.  पिकल बॉल या खेळाचा विद्यापीठ खेळांमध्ये तसेच ऑलिंपिक खेळांमध्ये समावेश व्हावा, असेही ते म्हणाले. या खेळातून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवता येते ही महत्त्वाची गोष्ट खेळाडूंनी लक्षात घ्यायला हवी. यावेळी खेळातील यशस्वी खेळाडू यांना नॅट फाउंडेशन मुंबई व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी चोपडा यांच्यातर्फे प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
     सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एल. बी. पटले यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, यशस्वी खेळाडू, विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 359
Previous Post

निवडणूक कामासाठी नेमलेल्या आशावर्कर, अंगणवाडी सेविका व शिपाई यांची कमी मानधनावर बोळवण

Next Post

आम आदमी पार्टीची पहेलानपुर येथे शाखा स्थापना

Next Post
आम आदमी पार्टीची पहेलानपुर येथे शाखा स्थापना

आम आदमी पार्टीची पहेलानपुर येथे शाखा स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us