लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ जून – पारंपारिक रितिरिवाजांप्रमाणे आत्तापर्यंत आई वडिलांचे निधन झाल्यास मुलगाच चितेला अग्नीडाग देऊन सर्व धार्मिक विधी करत होता. मात्र आता काळाने कास बदलली असून प्रथा व परंपराही काळानुरूप बदलू लागल्या आहेत. मुलगा आणि मुलगी आता समान झाली आहेत. येथे आईच्या निधनापूर्वीच भाऊ अपघातात जग सोडून गेल्याने मुलीनेच चितेला अग्निडाग दिला. दशक्रिया विधीला डोक्यावरील केसांची लटही दिली आणि दशक्रियाविधी व गंधमुक्त चे सर्व धार्मिक विधीही पार पाडले. मुलगा – मुलगी समानतेच्या दिशेने पडलेल्या धाडसी पाऊलाची फक्त चर्चाच होत नसून परिसरात कौतुकही होत आहे.
श्रमदानातून शाळा रंगविण्याचा नवा उपक्रम संपन्न
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...