टिम लोकप्रवाह, वर्धा दिनांक 21 (सचिन ओली): एकीकडे जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध गौण खनिज उत्खनन करणारे व वाळू माफियांवर कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. त्यामुळे अवैध वाळू व गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तर दुसरीकडे वर्धा तालुक्यातील पिपरी मेघे येथून जवळच असणाऱ्या कारला या गावाच्या हद्दीत असणाऱ्या बारसाना लेआउट च्या मालकानी चक्क वन विभाग व महसूल प्रशासनाच्या जमिनीवर अवैद्यरित्या गौणखनिज उत्खनन लाखोंचा महसूल बुडविला असल्याचा प्रकार आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी उघडकीस आणला आहे. आता यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करता? याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कारला या गावाच्या हद्दीत असणारा लेआऊटधारक हा अवैध गौणखनिज उत्खनन करीत असल्याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्याकडे केली. त्यामुळे त्यांनी सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली. व तेथील परिस्थिती बघता त्यांना गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी ताबडतोब तहसीलदार संदीप पुंडेकर यांना दूरध्वनीवर संपर्क करून कळविले असता तहसीलदार यांनी मंडळाधिकारी प्रशांत हाडे व तलाठी के. एस. बुलकुडे व रोशन खैरकार यांना त्याठिकाणी जागेचा पंचनामा करण्याकरीता पाठवले. त्यांनी पंचनामा करून सदर अहवाल हा तहसीलदार यांना सादर करणार आहेत. याच लेआऊट धराकाने वन विभागाच्या जमिनीवरही मोठे शेड बांधल्याचे सुद्धा निदर्शनास आले. त्यावर आता वनविभाग काय कारवाई करते हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे.
मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी नाल्याचे खोदकाम बघुन मौखिक चर्चा करीत असताना अंदाजे एक कोटी रुपयापेक्षा जास्तचे अवैध गौण खनिज उत्खनन झाले असल्याचे समजत आहे.
महसूल प्रशासन व लेआऊट धारक यांच्यात अर्थकारण तर झाले नाही ना? – श्रीकांत दोड, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, वर्धाकारला या गावातील ग्रामस्थांनी सदर बरसाना ले आऊट संदर्भात तक्रारी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्याकडे दिल्या, या तक्रारीची चौकशी करण्याकरिता ले आऊट वर गेलो असता, त्याठिकाणी 20 फूट खोल आणि 10 फूट रुंद अश्या नाल्या, 70 एकर मध्ये असलेल्या ले-आऊट च्या चारही बाजुला खोदलेल्या असल्याचे माझ्या निदर्शनास आले, इतक्या मोठ्या प्रमाणात खोदकाम करून त्यातील गौण खनिजाची परस्पर विल्हेवाट लावल्या गेली आणि प्रशासकीय अधिकारी डोळे झाकुन असल्याची संशयास्पद भुमिका बजावतात, याचा अर्थ असा की मोठे अर्थकारण सदर लेआऊट धारक व प्रशासकीय यंत्रणेत झाले असावे, ही शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनाच्या व वन विभागाच्या मालकी हक्काचे असलेल्या जमिनीतील गौण खनिज काढण्या इतपत मजल गाठणाऱ्या गौण खनिज उत्खनन व भु-माफियास याची तीळ मात्र भीती वाटली नाही. मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जागेच्या झालेल्या मौका पंचनाम्याच्या आधारावर सदर ले – आऊट धारकावर तात्काळ कारवाई करावी.
चौकशीअंती यामध्ये जर कुठल्या महसूल प्रशासनातील कर्मचारी अथवा अधिकारी यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी लोकप्रवाह न्यूज तर्फे जिल्हाधिकारी यांना करण्यात येत आहे.
Post Views: 593