टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 29 – नुकतीच लोकसभेची रणधुमाळी आटोपली असून आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी राज्यातील सर्व पक्षांनी विधानसभेसाठी उमेदवारी कोणाला द्यावी यासाठी चाचपणी करायला सुरुवात केली आहे. कारण लोकसभेला उमेदवारी देण्यासाठी उशीर झाल्यामुळे काही जागा या पक्षांना गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे यंदा लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करून निवडणुकीच्या कामाला लागतील असे एकूण चित्र सद्याच्या राजकीय हालचालीवरून दिसून येत आहे.
याच अनुषंगाने दिल्ली येथे महाराष्ट्र आम आदमी पार्टीची आपच्या राष्ट्रीय कार्यालयात नुकतीच अती महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीच्या तयारीला लागण्याच्या सुचना जिल्हाध्यक्षाना देण्यात आल्या असल्याची खात्रीदायक बातमी लोकप्रवाहला मिळाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून एक होतकरू व्यक्तिमत्व असणारे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड हे आता विधानसभेच्या रणधुमाळीत उतरतील हे मात्र नक्की!
सर्व सामान्यांना मान्य असणारा, पक्षाचा निष्ठावंत, धडाडीचा, प्रामाणिक, मृदुभाषी आणि होतकरू चेहरा म्हणुन श्रीकांत दोड यांचे नाव वर्धा विधानसभेच्या उमेदवारी करिता चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्या वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीची धुरा ही श्रीकांत दोड हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हतातील युवक वर्ग हा आप पक्षाशी जुळत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
पक्षाची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्या पासून आपल्या कार्यकुशलतेने झंझावती पक्ष बांधणी आणि जन सामन्यांच्या समस्या निराकरणासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तीमत्व म्हणुन ते सर्वसामान्यांना ज्ञात आहेत. उत्कृष्ट पक्ष बांधणीचे कार्य आणि दांडगा जनसंपर्क ह्या महत्वाच्या बाबी विचारात घेऊन पक्षाने श्रीकांत दोड यांना विधान सभेचा उमेदवार घोषित केल्यास वावग ठरणार नाही.
या संदर्भात आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि, अतिशय सामान्य कुटुंबातुन असुन मला कोणताच राजकीय वारसा नाही तरीसुद्धा राजकारणात आलो ते फक्त आणि फक्त समता, बंधुता आणि न्याय या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे काम करण्यासाठी आलो आहे. कोणता स्वार्थ किंवा अपेक्षा ठेऊन कधी कोणाची मदत केली नाही. मी जे काही आहे ते केवळ जनतेच्या प्रेमामुळे आहे. आमचा पक्ष आगामी सर्वच निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे. जर पक्षांनी मला संधी दिली तर ती संधी माझी नसून जनतेची राहील, त्या संधीच सोन करणे हे जनतेवर सोपवणार. उमेदवारी मिळाली तर माझी लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ठरेल. माझ्याकडे निवडणुकी करिता लागणारे आर्थिक पाठबळ भक्कम नसल्याकारणाने, लोक वर्गणीतून निवडणूक लढण्याची कार्यकर्ते आणि जनतेची ईच्छा आहे. तुर्तास मी पक्षाच्या येणाऱ्या आदेशाचे पालन करण्याकरिता सज्ज आहोत. फक्त आता लक्ष लागले पक्षा कडून येणाऱ्या आदेशाचे….!
Post Views: 349