टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 – शहरात मागील तीन ते चार दिवसापासून सुरु असणाऱ्या रिपरिप पावसाने रस्त्यावर असणारे खड्डे हे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे सहयोग कॉलनी परिसरातील रहिवासीयांना याचा भयंकर मनस्ताप होत आहे. या परिसरातून ये जा करणारे विद्यार्थी व इतर नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ तात्पुरती स्वरूपाची उपाययोजना करीत यावर मुरूम टाकावा हीच अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
नगरपालिका प्रशासनात कार्यरत असणाऱ्या बांधकाम विभागाने शहरातील संपूर्ण परिसराचा सर्व्हे करुन तात्पुरती डागडुजी करावी. कोणी तक्रार करेल किंवा बातमी येईल याची वाट बघू नये.
हा रस्ता अत्यंत रहदरीचा असून या मार्गे तालुक्यातील लासूर, चुचाळे, चौगांव व मामलदे आदी खेड्यांची वर्दळ होत असते. त्यातच या मार्गांवर महिला मंडळ शाळा असून त्या शाळेतील विध्यार्थी सुद्धा याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.