टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) : येथील जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने बदलापूर व कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय अध्यक्ष अल्का लांबा यांच्या आदेशानुसार तसेच संध्या सव्वालाखे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली व चारुलता टोकस उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने स्त्रियांवर होणाऱ्या अमानुष घटनेच्या विरोधात आंदोलन केले. कोलकत्ता येथील एका उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचाराची अमानुष घटना ही ताजी असतानाच महाराष्ट्रामध्ये बदलापूर येथे मानवी मन हेलावून टाकणारी व माणुसकीला काळीमा फासणारी अमानवीय घटना घडली या घटनेचा वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने दिनांक 22/08/24 रोजी जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आत्मक्लेष आंदोलन बजाज चौक वर्धा येथे करण्यात आले. याप्रसंगी दगडाला राखी बांधून दगडासारख्या सरकारचा निषेध केला तसेच थाळीनाद करून गुन्हेगारास भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी करित महिलानी सरकार अशा वाईट घटनांवर चूप का आहे? व या घटनांची दखल का घेत नाही?असा खडा सवाल सरकारला विचारला,तसेच सरकारने महिलांना सुरक्षा प्रदान करावी आणि ‘लाडकी बहीण योजना’ काढून पैसे देण्यापेक्षा ‘लाडकी बहीण सुरक्षा’ योजना काढून महिलांना सुरक्षा प्रदान करावी असी मागणी केली. आज अगदी वृद्ध स्त्री पासून ते अगदी चिमुकल्या मुलींपर्यंत महिला कुठेही सुरक्षित नाही दिवसेंदिवस महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहे त्यामुळे संपूर्ण महिलांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झालेले त्याच्या मनातील ही भिती दुर करने सरकारचे प्रथम कर्तव्य आहे परंतु आजचे सरकार आपले कर्तव्य पार पडताना दिसत नाही असे प्रतिपादन वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष व महिला कार्यकर्ता यांनी आंदोलनाच्या वेळी केले.
बदलापूर येथील अमानवीय घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये घटनेमधील गुन्हेगारास त्वरित फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. याप्रसंगी वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या प्रतिमा जाधव, शैला दीक्षित, सपना परियाल, शबाना अली, दामिनी कुंभारे, दोडताई, सीमा सुरकार, जयश्री कटारे, सोनीका जाधव, संगिता वादाफळे, निमा फुलबांधे, नुतन वैद्य, रुची तिवारी, प्रनिता डंबाले, अमृता यादव आदिसह इतर महिलांची उपस्थिती होती.