टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली ) – वर्धेतील नाट्य क्षेत्र व नाट्य चळवळ जिवंत ठेवून सातत्याने खूप मुलांना नाट्यकला शिकवणारे प्रतिक सूर्यवंशी यांचा स्पोर्ट कराटे असोसिएशन, वर्धा यांच्याकडून “वर्धा जिल्हा गौरव पुरस्कार” वर्धा लोकसभा चे खासदार अमर काळे, मोहनबाबू अग्रवाल, रमेश थोरात आणि पवण तिजारे यांच्या हस्ते असोसिएशनच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 ला सार्वजनिक बजाज वाचनालय हॉल येथे देण्यात आला.

या प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन मोहिते, संचालक सभासद गंगाधर पाटील, भगवानदास आहुजा, श्याम पठवा सर, ज्येष्ठ समाजसेवक विलास कुळकर्णी, प्रवीण पेठे, सहसचिव हरीश पाटील, इमरान राही, कार्याध्यक्ष संतोष सेलूकर, प्रकाश खंडार, सचिव मंगेश भोंगाडे, निखिल सातपुते, कार्यालय प्रमुख सुशांत जीवतोडे आदी सभासद उपस्थित होते. प्रतीक सूर्यवंशी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी सुविधा झोटिंग, पूनम बोबडे, जान्हवी ठोंबरे, आयुष मधापुरे, सोहेल अन्सारी, विभा भोयर, रुपाली जुलमी, साक्षी हिवरे, आयुष ढोरे, रितिका गोडे आदीनी शुभेच्छा दिलाय.








