सचिन ओली, वर्धा दि.6 : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने पुलफैल येथील नागरी आरोग्य केंद्र येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नलीनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी दिघेकर, डॉ. सुवर्णा खोब्रागडे, डॉ. सुप्रिया गोमासे, श्रीमती मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रौढ बीसीजी लसीकरण कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करुन जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या संख्येनुसार 100 टक्के प्रौढ बीसीजी लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन जितीन रहमान यांनी लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमंत ढोबळे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कर्मचारी श्री. खोब्रागडे, श्री. बाखडे, श्री. सारडे, श्री. सोनटक्के, श्री. पुनवटकर, श्री. जगताप, श्री. शिंदे, श्री. साळवे, श्री. आदमने तसेच नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.