सचिन ओली, वर्धा दि. 7 : तालुक्यातील तरोडा येथील पंजाब नॅशनल बँक शाखा ही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सावली येथील शेतकरी कृषी कर्ज घेण्यासाठी बँकेत जात असता तेथील शाखा अधिकारी सुटीवर आहे, असे सांगून शेतकऱ्यांना व महिलांना वापस पाठविण्यात येत असल्याचा प्रकार बँकेत सुरु असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश ईखार यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी लागलीच बँकेत जाऊन याबाबत तेथील अधिकारी व कर्मचारी यांना खडसावंत जाब विचारला.
बँकेतील बहुतेक कर्मचारी हे उपस्थित राहत नाहीत याबाबतही त्यांनी विचारणा केली. तसेच शेतकऱ्यांना कृषी कर्ज व PMEGPअंतर्गत असणारी कर्ज प्रकरणे लवकरात लवकर पास करून मार्गी लावण्याबाबत सांगितले. व यापुढे जर का शेतकरी बांधव व इतर सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवस्थापनाकडून काही त्रास झाला तर बँकेला कुलूप लावून आंदोलन करेल असा इशाराच शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश इखार यांनी दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश इखार यांच्यासह उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, सावली येथील शेतकरी मनोहर चांभारे, निनाद बोरकर, भूषण झाडें, सुरज गुळघाने, किसनाजी कडू, प्रवीण चांभारे, धनराज चांभारे, राहुल कडू, पवन गुळघाने, महेश गुळघाने, सुधीर वाघमारे, अरविंदा बोरकर, राजूभाऊ बोरकर आदिसह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.