सरल वास्तू या नावाने प्रसिद्ध असलेले ज्योतिषी चंद्रशेखर यांच्या हत्येची घटना समोर आली आहे. ज्योतिषाचार्य चंद्रशेखर कर्नाटकच्या हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये होते, यावेळी काही लोक त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये पोहचले होते. यावेळी हल्लेखोरांनी प्रथम गुरुजींच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घेतले, त्यानंतर दुसऱ्याच सेकंदाला चाकूसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्लेखोरांनी गुरुजींवर जवळपास 17 हून अधिक वेळा वार केले आहेत. यातच त्यांचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद
ज्योतिषी चंद्रशेखर यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. आज दुपारच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी त्यांच्या जवळ येऊन चाकूसारख्या शस्त्राने वार केल्याचे दिसतेय, यामध्ये आरोपी हत्येनंतर घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे.
Chandrashekhar Guruji's murder is heinous, it happened in daylight. I have spoken to Police Commissioner Labhu Ram to nab the culprits seen in the video. Police is already on it: Karnataka CM Basavaraj Bommai pic.twitter.com/jozMUi0iWb
— ANI (@ANI) July 5, 2022
मात्र हे हल्लेखोर कोण आहेत आणि या हत्येमागचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरु केला आहे. चंद्रशेखर गुरुजी हे मूळचे बागलकोटचे असून काही कौटुंबिक संबंधामुळे ते हुबळी येथे आले होते. हत्येनंतर पोलीस आयुक्त एल राम, डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था, डीईसीपी गुन्हे आणि वाहतूक ताबडतोब दाखल झाले. आरोपींना पकडण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्याचवेळी मृतदेह KIMS रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.