Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन

कथाकार राजेंद्र पारे यांच्याशी विद्यार्थ्यांनी केली 'आकांक्षा' कथेवर सविस्तर चर्चा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 9, 2024
in शैक्षणिक, चोपडा
0
चोपडा महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चोपडा दि. 09 : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ.सुरेश पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी कथालेखक कादंबरीकार व कवी राजेंद्र पारे, उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ तसेच सौ. एम. टी. शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. एम. एल. भुसारे यांनी करून दिला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना कथालेखक राजेंद्र पारे व व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर..

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रथम वर्ष कला वर्गाच्या अभ्यासक्रमासाठी ‘खान्देशी कथा’ नेमण्यात आल्या आहेत. ‘खान्देश कथाप्रबोध’ या मराठी अभ्यास मंडळ संपादित पुस्तकांमध्ये साहित्यिक राजेंद्र पारे यांची ‘आकांक्षा’ ही अभ्यासक्रमास नेमलेली कथा समाविष्ट केली आहे. विद्यार्थ्यांना या कथेची पार्श्वभूमी तसेच निर्मिती प्रक्रिया व प्रेरणा स्वतः लेखकाकडून जाणून घेता यावी, या उद्देशाने मराठी विभागातर्फे ‘लेखक आपल्या भेटीला’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी कथालेखक राजेंद्र पारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘लेखकाचे लेखन आणि लेखकाचे जीवन यात फरक असतो. ‘आकांक्षा’ या कथा लेखनाचा काळ पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा असून या कथेत गतकालीन घटनांना मूर्त रूप दिले आहे. खेड्यातील दीक्षा नावाच्या विद्यार्थिनीला शहराविषयी आकर्षण वाटते व ती अभिनेत्री होण्याच्या आकांक्षेने शहरांमध्ये जाते. परंतु तेथील वातावरण पाहून व वाट्याला आलेला अनुभव पाहून तिच्या आकांक्षेचा चुराडा व भ्रमनिराश होतो. थोडक्यात वर्तमानपत्राच्या जाहिरातीतील फसवेगिरीचे वास्तव चित्र ‘आकांक्षा’ नावाच्या कथेत रेखाटले आहे. त्याचबरोबर संपतराव जाधव यांचे सुधारणावादी विचार प्रतिबिंबित केले आहेत. आजची महाविद्यालयीन पिढी कमी वेळात प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात, झगमगटाच्या दुनियेत फसतात, त्यांना ही कथा वास्तवाचे भान निर्माण करून देणारी आहे. यावेळी कथालेखक राजेंद्र पारे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले.

उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना कथालेखक राजेंद्र पारे

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. एन. सोनवणे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लेखकाकडून साहित्य निर्मिती संकल्पना व प्रेरणास्रोत जाणून घेता यावेत. लेखकाचे अनुभव जवळून ऐकता यावेत ही या कार्यक्रमाच्या आयोजनामागील विभागाची भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे’.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. एम. एल. भुसारे यांनी केले तर आभार जी. बी. बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश सोनवणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

 

 

Post Views: 303
Previous Post

शेतकऱ्यांना नाहक त्रास झाला तर बँकेला कुलूप ठोकेल – शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश ईखार

Next Post

डेंग्यू प्रतिबंधसाठी आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासन सज्ज

Next Post
डेंग्यू प्रतिबंधसाठी आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासन सज्ज

डेंग्यू प्रतिबंधसाठी आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासन सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us