टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 – येथील विवेकानंद विद्यालयाचा इयत्ता 8 वीचा विद्यार्थी देवेश विवेकानंद पाटील याने प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत “ऋतुमानाप्रमाणे निसर्गात होणारे बदल” या विषयावर निंबध स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याला या स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त होत रुपये तीन हजार व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले.
त्याबद्दल विभागीय वन अधिकारी संजय पाटील, सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार देवरे सामाजिक वनीकरण, गुणवंत देसले व अंकुश यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ऍड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त नरेंद्र भावे, पवन लाठी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, पालकवृंद व विद्यार्थीवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले. त्याला मुख्याध्यापक एस. एल. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.