Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न चर्चेत लागले मार्गी

फरक साठी तब्बल ४४३ कोटी करण्यात आले वितरीत!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 13, 2024
in महाराष्ट्र, शासकीय
0
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न चर्चेत लागले मार्गी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 –  मुंबई येथे दिनांक 11 सप्टेंबर रोजी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या सेवासदन या निवासस्थानी ग्रामविकास विभागाचे सचिव, उपसचिव, अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली

कर्मचाऱ्यांना तब्बल 443 कोटी रुपयाच्या फरकाचे वितरण 

ग्रामविकास विभाग ने जिल्हा परिषदांना 5 सप्टेंबर रोजी 200 कोटी दिले तसेच 15 मे ला 243 कोटी रुपये असा तब्बल 443 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तसेच येत्या 2 दोन दिवसात कर्मचाऱ्यांचे पगार होतील. व लवकरच 19 महिन्याच्या किमान वेतनाचा फरक मिळेल,  अशी माहिती नामदार गिरीश महाजन यांचे पीए देशमुख यांच्या मध्यस्थीने घेण्यात आलेल्या चर्चेनंतर मिळाली, अशी माहिती महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव कॉम्रेड अमृत महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 


याबाबत सविस्तर असे की, या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची चर्चा करण्यात आली यात ठरले असे की,
१. यावलकर समिती च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद कडुन 8 दिवसांत अहवाल मागविण्यात येईल निशिक वगळता तात्काळ कारवाई करण्याचे पत्र जिल्हा परिषद ला पाढविण्यात येईल व अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल.
२. कर्मचाऱ्यांच्या पगाराचे अनुदानासाठी वसुलीची अट कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
३. किमान वेतन समिती गठीत करण्याबाबत उद्योग ऊर्जा व कामगार विभागकडे तात्काळ कळविण्यात येईल.
४) अनुकंपा तत्त्वावर रिक्त जागेवर ग्रामपंचायत कर्मचारी याची भरती करण्याबाबत विचार व अभ्यास करून निर्णय करण्यात येईल.
५) लोकसंख्येची जाचक अट कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे व नवीन आकृतीबंध बाबत माहिती मागवलेली आहे.
६) राहणीमान भत्ता ग्रामनिधीतून द्यावा म्हणून ग्रामपंचायतींना कलम 154 खाली सूचना देण्यात येतील. तो शंभर टक्के शासनाच्या तिजोरीतून द्यावा याबाबत सरकार सकारात्मक आहे.

वसुलीची अट रद्द करण्यासाठी सरकार पॉझिटिव्ह आहे परंतु वित्त खात्याने निगेटिव रिमार्क दिलेला आहे. हा प्रश्न मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात यावा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत उपसचिव, ग्रामविकास मंत्री याचे स्विय सहायक देशपांडे तसेच ग्रामपंचायत विभागाचे मुख्य सचिव गांगुर्डे, अवर सचिव श्रीमती .शेटे आदिसह महासंघाचे राज्य सचिव कॉ. नामदेव चौहान, सखाराम दुगूडे, मंगेश म्हात्रे, अमृत महाजन, गोविंद म्हात्रे, चत्रुगण लांजेवार, उज्वल गांगुर्डे, शाम चिचने, विनोद तोर आदींची उपस्थिती होती.

Post Views: 615
Previous Post

गुलालच्या उधळणीत आणि प्रचंड उत्साहात बाप्पाला निरोप दिला निरोप

Next Post

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचा देवेश पाटील ने पटकविला द्वितीय क्रमांक!

Next Post
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचा देवेश पाटील ने पटकविला द्वितीय क्रमांक!

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचा देवेश पाटील ने पटकविला द्वितीय क्रमांक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us