सचिन ओली, वर्धा दि 13 : जिल्यातील वायफड येथील यशवंत विद्यालय येथे स्व. गायत्रीदेवी अग्रवाल सेवा संस्थान, देवळी या संस्थेद्वारे महापुरुषांचे चरित्र, शालेय पुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना वाचणाची ओढ लागून महापुरुषांच्या चरित्रांची माहिती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता. मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवी व उद्योजक मोहनबाबू अग्रवाल, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक प्रशांत वडाळकर, प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष पवन तिजारे, स्पोर्ट शोतोकान कराटे असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश भोंगाडे, स्नेहालय संस्थेचे प्रबंधक विश्वस्त विलास कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी उमेश भस्मे, दिनेश अग्रवाल, समशेर खा पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत भुरे यांनी केले तर आभार सौरभ वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाय. पी. बोंडे, ए. एस. बाराहाते, एन. एम. भाकरे, सी. एस. कांबळे, ए. डब्ल्यू. लाडे, आर. एन. तराले, व्ही. पी. सायंकार, जाकीर पठाण यांनी अथक परिश्रम घेतले.