Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी वैद्यकीय जनजागृती मंच सज्ज

हनुमान टेकडी ऑक्सिजन पार्क येथे जय्यत तयारी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 14, 2024
in वर्धा जिल्हा, वैशिष्ट्यपूर्ण
0
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी वैद्यकीय जनजागृती मंच सज्ज
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सचिन ओली, वर्धा दि. 14 : मागील दहा वर्षांपासून वैद्यकीय जनजागृती मंच व इंडियन रेडक्राँस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पर्यावरणपूरक निर्मळ गणेश मूर्ती विसर्जन उपक्रम राबविला जात आहे. पहिल्या वर्षी दोन आकडी संख्येत विसर्जनाकरिता आलेल्या मुर्त्यांची संख्या मागील वर्षी 3800 इतकी होती. हा उपक्रम आता लोक चळवळ झाला असून, यंदाच्या विसर्जन सोहळ्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचाची संपूर्ण टीम सज्ज असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत गणेश विसर्जनाबाबत सविस्तर माहिती देतांना डॉ. सचिन पावडे व सोबत इतर

डॉ. सचिन पावडे पुढे म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला तेव्हा आम्ही घरोघरी जाऊन नागरिकांकडून पर्यावरणपूरक विसर्जनाकरीता मूर्ती घेत होतो. हा उपक्रम वर्ध्यात हळूहळू रुळला. हनुमान टेकडी ऑक्सिजन पार्क येथे सध्या दोन कुंड आणि तीन लहान कुंड आहेत. गेल्या काही वर्षांतील जनजागरणाने पीओपी मूर्तींची संख्या कमी झाली आहे. टेकडीवरील कुंडांमध्ये विसर्जित करण्यात येणा-या मूर्तींची माती संकलित करून ती पुन्हा कुंभारांना दिली जाते. या माध्यमातून पुढील वर्षी 200 ते 300 मूर्तींची निर्मिती केली जाते. तसेच येथे जमा होणा-या निर्माल्यापासून खत तयार केले जाते. या उपक्रमांतर्गत दीड दिवस ते दहा दिवसांच्या गणपती उत्सवाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यानुसार विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कुंडांमध्ये चार फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन यापूर्वी झाले आहे. टेकडीवरती माजी विधान परिषद आमदार रामदास आंबटकर यांच्या निधीतून सभामंडप बांधण्यात आल्याने या आयोजनाला हातभार लागला असल्याचेही डॉ. पावडे यांनी सांगितले.

महाआरतीचे आयोजन
मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून यादिवशी सर्वाधिक मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यानिमित्त सायंकाळी 5 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी या उपक्रमास मदत करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

धाम नदीवरील भार कमी
‘व्हीजेएम’च्या उपक्रमाला तसेच जनजागरणाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पवनार येथील धाम नदीत विसर्जनाकरिता होणारी गर्दी बरीचशी ओसरली आहे. नागरिक धाम नदी परिसरात न जाता व्हीजेएमच्या टेकडीवरील कुंडात मूर्ती विसर्जनाला प्राधान्य देऊ लागले. ‘व्हीजेएम’च्या उपक्रमापासून प्रेरणा घेत अनेक सामाजिक संघटना-संस्था, नगरपालिकेनेही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाला चालना दिली. आज नागरिक स्वतःच्या घरीही कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जित करतात.

Post Views: 248
Previous Post

विद्यार्थ्यांना चरित्र पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

खा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास तात्काळ अटक करा

Next Post
खा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास तात्काळ अटक करा

खा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास तात्काळ अटक करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us