सचिन ओली, वर्धा दि. 14 : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपचे माजी आमदार तरविंदरसिंग मारवाह यांच्या व भाजपा विरोधात शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडी तर्फे तीव्र निदर्शने देत आंदोलन करण्यात आले. सदर निषेध आंदोलन वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या नेतृत्वात दिनांक 13 सप्टेंबर रोजी करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये भाजपचे माजी आमदार तरविंदरसिंग मारवाह यांना त्वरित अटक करण्याची मागणी जिल्हा काँगेस कमिटी व महाविकास आघाडीने केली आहे अन्यथा काँग्रेस व महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, सुधीर पांगुळ, काँग्रेस शहराध्यक्ष सुरेश ठाकरे, अभुदय मेघे, वैद्यकीय जनजागृती मंच अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, शैलेश अग्रवाल, तुषार उमाळे, बापू टोणपे, माजी पंचायत समिती सदस्य बाळा माउसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौरभ शेळके, सुकेशनि धनविज, सुनील कोल्हे, युवा काँग्रेसचे अंकुश मुंजेवार, राष्ट्रवादीचे नितेश कराळे, संदीप किटे, प्रणय कदम, प्रवीण पेठे, विविध फ्रंटल सेल व विभाग, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...