टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे हिंदी दिवस आज रोजी साजरा करण्यात आला. राष्ट्रभाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, अश्विनी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. त्यासाठी त्यांना शाळेतील नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. भूमी पाटील, अनोशा सय्यद, प्राची धनगर आणि श्रीजा लासूरकर या विद्यार्थिनींनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले. इयत्ता 7वी आणि 8वीच्या विद्यार्थिनींनी ‘हिंद देश के निवासी’ हे गीत सादर केले. ध्रुवी पाटील, अनुष्का पाटील आणि अनुष्का सुर्वे या विद्यार्थिनींनी हिंदी भाषेचे महत्व कथ्थक नृत्यातून सादर केले. सारे जहाँ से अच्छा हे गीत संस्कृती शिंदे या इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनीने व शिक्षिका अश्विनी पाटील यांनी सादर केले. शिक्षक जगदीश पाटील यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. हिंदी दिनाच्या अनुषंगाने इयत्ता 1ली ते 5वी साठी राष्ट्रभाषा हिंदी बोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 6वीसाठी प्रश्नमंजुषा, इयत्ता 7वी आणि 8वी साठी हिंदी सुलेखन स्पर्धा, इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जयश्री सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सुचिता पाटील यांनी केले. या विविध स्पर्धांसाठी हिंदी शिक्षक जयश्री सुर्यवंशी, जगदीश पाटील, सुचिता पाटील, शितल भावसार आणि रुपाली पाटील यांचे सहकार्य लाभले. हिंदी दिनाच्या उपक्रमांसाठी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.