टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 – प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि ३०२ या अंतर्गत गुन्हा दाखल करा, या मागणीची तक्रारीचे आवेदन मनसेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल सुभाष वानखेडे यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना देण्यात आले.
या तक्रार आवेदनात म्हटले आहे की, ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र व श्री स्वामी समर्थ्यांच्या विषयी बेताल व वादग्रस्त विधाने करून श्री स्वामी समर्थ भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने जाणून – बुजून आक्षेपार्ह विधाने केली आहेत. यामुळे समस्त हिंदुच्या भावना दुखावल्या आहेत. तरी ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.
या प्रसंगी शामसिंग परदेशीं, माजी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, राजाराम पाटील, नरेश महाजन, मनीष गुजराथी, शाम सोनार, प्रदीप बारी, सुधाकर चौधरी, प्रेम घोगरे, भैया महाजन यांसह अन्य उपस्थित होते.