टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 – राष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पर्यायाने समाजाला सुसंस्कृत व विकासाच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी तत्पर असणाऱ्या व विद्यार्थी घडविण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना दरवर्षी नॅशनल लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी क्लब तर्फे “नेशन बिल्डर अवॉर्ड” देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. या अंतर्गत रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे दि. १४ रोजी सायंकाळी पाच वाजता जुन्या शिरपूर रोडवरील रोटरी भवन येथे “नेशन बिल्डर अवॉर्ड – २०२४” वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य रोटे डॉ. ईश्वर सौंदांणकर, सचिव भालचंद्र पवार, प्रकल्प प्रमुख जगदीश महाजन, सह प्रकल्प प्रमुख अमित बाविस्कर यांच्यासह पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून क. ब. चौ. उ. म. वि. चे कुलसचिव डॉ. विनोद प्रभाकर पाटील तसेच डॉ. जयेंद्र लेकुरवाळे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव) हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. लेकुरवाळे यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक कशा पद्धतीने आपले कार्य करत असतो हे त्यांनी समाजातील अनेक उदाहरणे देऊन सांगितले. त्याचप्रमाणे डॉ. विनोद पाटील यांनी प्रशासकीय कामकाज हे कशा पद्धतीने करावे लागते तसेच शिक्षक व प्रशासन यांच्यात समन्वय कसा साधला जातो याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करत पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव केला.
नेशन बिल्डर अवॉर्ड २०२४ चे पुरस्कारार्थी
सौ. शुभांगी मंगेश भोईटे, विवेक रामभाऊ पाटील, भागवत उत्तमराव जाधव, दिपाली विनायक पाटील, चंद्रकांत दगडू पाटील, महेशकुमार चंद्रशेखर शिंदे, दौलत परशा पावरा, जितेंद्र मुरलीधर पाटील, अरुणा सुहास देवराज, सोनाली मधुकर साळुंखे, नुसरतजहां रियाझोद्दीन, सुनील बाजीराव पाटील, प्रीती आशिष गुजराथी, प्रमोद गंगाराम भालेराव, प्रा. डॉ. अनंत विनायकराव देशमुख, डॉ. अनिल बाबुलाल सूर्यवंशी व दीपावली विनायक पाटील
या सोहळ्यासाठी प्रकल्प प्रमुख जगदीश महाजन, सह प्रकल्प प्रमुख अमित बाविस्कर यांच्यासह डिस्ट्रिक्ट जॉइंट सेक्रेटरी नितीन अहिरराव, व्ही. एस. पाटील, पंकज बोरोले, चेतन टाटीया, रुपेश पाटील, चंद्रशेखर साखरे, प्रदीप पाटील, आशिष जयस्वाल, महेंद्र बोरसे, शिरिष पालीवाल, विश्वास दलाल, चंद्रशेखर पाटील, अनुराग चौधरी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पी. पाटील व लीना पाटील यांनी तर आभारप्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले. यावेळी तालुक्यातील शिक्षक, पुरस्कारार्थींचे परिवारजन आदीसह इतर रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...