टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 16 – तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनात वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. या दोन ते तीन दिवसात सनपूले, वर्डी, कठोरा, कुरवेल, धनवडी व गरताड अशा बऱ्याच गावातील शेतातून असंख्य कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली असून चोरांकडून साहीत्यांची सुद्धा तोडफोड करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे या चोरांच्या टोळीला जेरबंद करण्याचे आव्हान ग्रामीण पोलीसांपुढे ठाकले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सनपुले शिवारातील शेतकरी मच्छिंद्र पाटील, शाम पाटील, अजित पाटील, आधार पाटील, वर्डी शिवारातील अमोल पाटील, आधार पाटील यांच्या सह १५-२० इतरही काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची केबल चोरी झाल्याची घटना दि. 14-9-2024 रोजी घडली. शेतातील केबलमधील तांबे धातुची चोरी व साहीत्यांची तोडफोडही चोरांनी केली. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असुन पोलीसांनी या चोरांच्या टोळीला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शेतकरी बांधवाना नाहक आर्थिक भुर्दंड
केबलची चोरी झाल्यास नवीन केबल खरेदी तसेच इतर कामी जवळपास तीन हजाराचा खर्च लागत आहे. तसेच अन्य साहीत्यांची तोडफोड झाली असल्यास तो वेगळा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असुन चोरी करणारी टोळी लवकरात लवकर जेरबंद करावी अशी मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना शेतकरी संघटनेने दिले आहे.
निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, किरण गुजर, विनोद धनगर, शाम पाटील, सचिन डाभे, अजित पाटील, कमलेश पाटील, स्वप्निल पाटील, सुभाष पाटील, विजय पाटील, दिलिप पाटील, मंजुशा पाटील आदीसह इतर शेतकरी उपस्थित होते
केबल चोरीचे प्रकार या पंधरा दिवसात तीन वेळा झाल पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर चोरांच्या बंदोबस्त करून शेतकऱ्यांना होणारा त्रासापासून मुक्त करावे व हे चोर ज्या भंगारवाल्यांना भंगार विकत आहेत. त्या भंगारवाल्यांवर सुद्धा पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी. जेणेकरून भंगारवाले या चोराकडून भंगार विकत घेणार नाहीत. परिणामत चोरीचे प्रकार होणार नाही.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...