टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 28 – शहरातील पिंक फिटनेस क्लब द्वारा आयोजित “रास रंग – 2024” या गरबा कार्यशाळेचे उद्घाटन दाते सभागृह, आर्वी रोड, वर्धा येथे संपन्न झाले. यावेळी आप जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, मुबईचे नृत्य निर्देशक प्रद्युम्न बुधलकर, पिंक फिटनेस चे संचालक संजय आचार्य व पूजा जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पिंक फिटनेस क्लबचे संचालक संजय आचार्य व पुजा जोशी यांच्या संकल्पनेतून रास रंग गरबा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व दुर्गा मातेच्या फोटोला मालार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
पिंक फिटनेस क्लबच्या संचालिका पुजा जोशी यांनी प्रास्ताविक करताना नवरात्राच्या या नऊ दिवसांन मध्ये एक उत्साहपुर्ण आणि नवचैतन्याची अनुभूती महिलांना होते, सोबतच गरबा नृत्याच्या निमित्याने मन प्रफुल्लित होऊन आपल्या आत लपलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, तसेच गरबा या नृत्याची सुरुवात गुजरात येथुन झाली, प्रामुख्याने गुजराती समाज या नृत्याला देवीच्या मंदिरातील गर्भगृहात मातीच्या दिव्यांच्या पणती घेऊन करायचे, त्यामुळे या नृत्याला गरबा नृत्य असे नाव मिळाल्याची माहिती पुजा जोशी यांनी दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सोनिया यादव यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णवी कटवे आणि पिंक फिटनेस क्लबच्या इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिशु विकास योजना व किसान धन योजना संबंधित अधिक माहिती हवी असल्यास 📱 8999078971 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.