चोपडा दि. 20 – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पिकल बॉल आणि बेसबॉल या खेळांमध्ये यश संपादन केल्यानिमित्त सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये अंजली भूपेंद्र पोळ, जिनिषा संदेश क्षिरसागर या माजी विद्यार्थिनी आणि इयत्ता नववीत शिकत असणारा दिव्यतेज अतुल पाटील या विद्यार्थ्याचा समावेश होता. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
व्हिएतनाम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पिकल बॉल या खेळात अंजली भूपेंद्र पोळ या विद्यार्थिनीने सोळा वर्ष वयोगटाखालील गटात एकेरी सामन्यात कांस्य पदक व दुहेरी सामन्यात रौप्य पदक प्राप्त केले. जीनिशा संदेश क्षिरसागर या विद्यार्थिनीने व्हिएतनाम येथे झालेल्या पिकल बॉल या खेळांत पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त केले. ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन तर्फे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
शाळेतील विद्यार्थी दिव्यतेज अतुल पाटील याने राष्ट्रीय स्तरावर ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या पानिपत, हरियाणा येथील नॅशनल पिकल बॉल टूर्नामेंट मध्ये एकेरी आणि दुहेरी सामन्यात रौप्य पदक प्राप्त केले. तसेच बेसबॉल या खेळासाठी या विद्यार्थ्याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, शाळा समन्वयक अश्विनी पाटील, क्रिडाशिक्षक भूषण गुजर, प्रा. अतुल पाटील, प्रा. भूपेंद्र पोळ, डाॅ. क्रांती क्षिरसागर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका कल्पना बारी यांनी केले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, शाळा समन्वयक निळकंठ सोनवणे, डाॕ. दिनानाथ पाटील, अशोक साळुंखे, विलास दारूंटे, दिपक सोमानी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.