वर्धा दि. 20 – भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये पहिलेच नाव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली असून कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, वर्धेचे पालकमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर येथील बल्लारपूर मधून लढतील तसेंच वर्धा विधानसभेतून डॉ. पंकज भोयर व हिंगणघाट मधून समीर कुणावार या विद्यमान आमदारांना तर देवळी मधून मागच्या विधानसभेला अपक्ष लढलेले राजेश बकाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच आर्वी विधानसभेच्या उमेदवारिबाबत सम्रभ कायम असून यामध्ये विद्यमान आमदार दादाराव केचे की देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
वर्धा, हिंगणघाट व देवळी येथे डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार व राजेश बकाने यांची उमेदवारी फायनल होताच त्यांच्या समर्थकांनी ढोल ताशा वाजवीत उत्साह साजरा केला.