चोपडा दि. 4 – चोपडा विधानसभा मतदारसंघात दि. 4 नोव्हेंबर माघारीच्या अखेरच्या दिवशी नऊ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात दोन्ही सेनेच्या उमेदवारांमध्ये समोरासमोर लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यात शिवसेनेचे चंद्रकांत बळीराम सोनवणे आणि शिवसेना (उबाठा) तर्फे प्रभाकर गोटू सोनवणे यांच्यामध्ये लढत होईल तर यांची गणिते भारत आदिवासी पार्टीचे सुनील तुकाराम भील आणि बसपाचे युवराज देवसिंग बारेला हे दोन उमेदवार बिघडवणार आहेत. तसेच पाच अपक्ष उमेदवार निवडणूक लढवणार असून रिंगणात उतरलेले आहेत.
हे पाच अपक्ष उमेदवार रिंगणातहिरालाल सुरेश कोळी, संभाजी मंगल सोनवणे, अमिनाबी रज्जाक तडवी, अमित तडवी, बाळू साहेबराव कोळी हे पाच उमेदवार अपक्ष म्हणून चोपडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत.
या अपक्ष उमेदवारांनी घेतली माघारडॉ. चंद्रकांत बारेला, माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, शुभम विसवे, भूषण भिल, साहेबराव सैंदाणे, रुस्तम नासिर तडवी, गौरव चंद्रकांत सोनवणे यांनी माघार घेतली.
जुना एकमेव चेहरादरम्यान या निवडणुकीत नऊ उमेदवार रिंगणात राहिले असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत एकमेव चेहरा म्हणजे उद्धवसेनेचे प्रभाकर गोटू सोनवणे हे एकमेव उमेदवार पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. गेल्या वेळेस ते निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून होते. त्यांनी त्यावेळेस 32 हजार मते मिळवलेली होती. या निवडणुकीत प्रभाकर गोटू सोनवणे हे सोडून सर्व चेहरे नवखे आहेत. त्यात चंद्रकांत बळीराम सोनवणे, सुनील तुकाराम भील, युवराज देवसिंग बारेला, हिरालाल कोळी, संभाजी मंगल सोनवणे, अमिनाबी रज्जाक तडवी, अमित तडवी, बाळू साहेबराव कोळी हे सर्व चेहरे या निवडणुकीसाठी नवखे आहेत.
नंबर दोनचे मत मिळूनही माजी आमदार वळवी यांची माघारगेल्या निवडणुकीत आमदार लता सोनवणे यानंतर माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी जवळपास 56 हजार मते मिळवून नंबर दोनची मते मिळवलेली होती या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु उमेदवार माघारीच्या शेवटच्या दिवशी दिनांक चार रोजी माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी माघार घेतलेले आहे ते यावेळी राष्ट्रवादी निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती मात्र चोपडा विधानसभा मतदारसंघ हा उद्धव सेनेचे शिवसेनेकडे गेल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. मात्र त्यांनाही वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्याने त्यांनीही गेल्या निवडणुकीत क्रमांक दोनचे मत मिळवले असले तरी माघार घेतलेले आहे
समोरासमोर लढत होण्याची चिन्हेया निवडणुकीत नऊ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रभाकर गोटू सोनवणे तर शिवसेनेचे चंद्रकांत बळीराम सोनवणे या दोघांमध्येच समोरासमोर लढत होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही उमेदवार हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दोन्ही कोळी समाजाचे उमेदवार असून त्यांच्यातच खरी लढत होणार हे मात्र निर्विवाद सत्य आहे. यापूर्वी चंद्रकांत बळीराम सोनवणे हे 2014 साली झालेल्या निवडणुकीत 11 हजार मतांनी निवडून आलेले आहेत.
Post Views: 414