जळगांव दि. 08 – घर बांधकाम साईटचे काम पुर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आहे होते मात्र सदर पोलवरुन विज कनेक्शन सुरु करण्यासाठी शिरसोली ता. जि. जळगांव येथील वरिष्ठ तंत्रज्ञ वायरमन विक्रांत अनिल पाटील, (देसले) वय ३८ यांनी तक्रारदार यांचेकडून वीज कनेक्शन सुरु करणेसाठी तब्बल 20 हजार रुपयांची लाच मागितली व ती स्वीकारतांना जळगांव लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात अटक करून गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे घर बांधकाम साईटचे काम पुर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आहे होते. सदर पोल वरुन विज कनेक्शन सुरु करण्यासाठी तकारदार हे महावितरण कार्यालय शिरसोली, जळगांव येथे वेळोवेळी गेले असता यातील आलोसे १) विकांत अनिल पाटील, (देसले) वय ३८ व्यवसाय नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ वायरमन शिरसोली युनिट ता. जि. जळगाव, रा. माउली नगर, जळगांव व इतर एक यांनी सदरचे काम करुन देण्याचे मोबदल्यात ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. व ३० हजार रुपयांपैकी १० हजार रुपये याअगोदर घेतले होते. तरीपण विज कनेक्शन चालु करुन देत नव्हते ते विज कनेक्शन चालु करुन देण्यासाठी उर्वरीत ठरलेले २० हजार रुपयांची मागणी करीत होते. त्याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग, जळगांव यांच्याकडे दि.१८.१०.२०२४ रोजी तक्रार केली होती. सदर तक्रारी प्रमाणे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी दोन नवीन पोल टाकले व विज जोडणी चालु करण्यासाठी ३० हजार रुपये लाचेली मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये यापुर्वी स्विकारल्याचे मान्य केले. तरी देखील तक्रारदार यांचेशी संबधित विज जोडणी करुन दिलेली नाही. सदरची विज जोडणी सुरु करण्यासाठी व पोल टाकुन दिले म्हणुन आज दि.०८.११.२०२४ रोजी आलोसे यांना उर्वरित २० हजार रुपये लाच रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेविरुध्द MIDC पोलीस स्टेशन ता. जि. जळगांव येथे भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ला.प्र. वि.नाशिक परिक्षेत्र पोलीस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर यांचे मार्गदर्शनाखाली व ला.प्र. विभाग, जळगांव पोलीस उपअधीक्षक योगेश जी. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली PSI/दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोना किशोर महाजन व पोकॉ. राकेश दुसाने आदींनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक योगेश जी. ठाकूर हे करीत आहेत.