चोपडा दि.११(प्रतिनिधी) – चोपडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकरआप्पा गोटू सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उबाठा पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, विजय परब, श्री. राणे, माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, माजी नगराध्यक्ष ऍड. संदीप पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी माजी नगराध्यक्ष जीवन चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर सभेचे आयोजन आज दिनांक 11 रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील बी. एड. कॉलेजच्या प्रांगणा जवळ, अरुण नगर येथे करण्यात आलेले आहे. तरी या प्रचंड विराट जाहीर सभेस मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने, मविआचे घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उबाठा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गट तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे यांच्यासह इतर आयोजकांनी केले आहे.