टिम लोकप्रवाह, वर्धा : नुकत्याच राज्यातील विधानसभा निवडणुका व निकाल आटोपून आता नूतन महायुती सरकार आरुढ झाले आहे. व आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. यामध्ये वर्धा विधानसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक करणारे पंकज भोयर यांना राज्यमंत्री मिळाले आहे. याबाबत वर्धा मतदारसंघातील जनतेने त्यांचे भरभरून अभिनंदन केले आहे. मात्र जिल्यातील अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश राहावा याकरिता मंत्री महोदय यांनी ठोस पावले उचलावी, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
अवैध वाळू उपसा हा आजूबाजूच्या गावातील ट्रॅक्टर व डम्परद्वारे करण्यात येतो. त्यामध्ये देवळी, वायगावं, सालोड व वर्धा येथील वाळू माफियांचा समावेश असल्याचे समजते…
अवैध आणि चोरट्या वाळू वाहतुकी संदर्भात प्रशासन कुठलीच कारवाई करत नाही हे बघता ग्रामपंचायत सिरसगाव (ध) ने या घाटाचा लिलावं शासकीय पद्धतीने व्हावा म्हणून ग्रामपंचायतिचा ठराव केला आहे, असे समजले.
तालुक्यातील सिरसगावं (ध) ग्रामपंचायत येथील भदाडी नदीमधून वाळूचा अवैध उपसा सुरू असून सदर वाहणेकामी ट्रॅक्टर व डम्पर चा सर्रास वापर केला जात आहे. दररोज रात्रीपासून ते पहाटे चार वाजेपर्यंत अवैध वाळू वाहतूक सुरु असते. याबाबत महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, स्थानिक तलाठी व मंडळाधिकारी यांना माहिती नसावी हे शक्यच नाही. या अवैध वाळू उपसा व चोरट्या वाहतुकीमुळे शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्याचे तीनतेरा झाले असून गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वारंवार तुटून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.