Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

बीएड प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या मनोरुग्णांच्या कार्यातील समस्या, आव्हाने व कार्यपद्धती

वेले येथील मानव सेवा तीर्थ येथे दिली क्षेत्रभेट

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 14, 2024
in चोपडा, शैक्षणिक
0
बीएड प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या मनोरुग्णांच्या कार्यातील समस्या, आव्हाने व कार्यपद्धती
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 – येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन करणाऱ्या मानव सेवा तीर्थ या संस्थेस भेट दिली. तेथील कार्यपद्धती व या मनोरुग्णांची सेवा करत असताना येणाऱ्या समस्या व आव्हाने यांची माहिती जाणून घेतली. शिक्षक हा समाज परिवर्तनाचा घटक असल्यामुळे शिक्षकांमध्ये विविध जीवन कौशल्यांची रुजवणूक होणे आवश्यक आहे. याच हेतूने संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांच्या प्रेरणेने चोपडा येथे अमर संस्था संचलित मनोरुग्णांसाठी असलेल्या मानव सेवा तीर्थ या संस्थेस भेट देऊन भावी शिक्षकांमध्ये सेवाभावी वृत्ती या जीवन कौशल्याची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने या संस्थेस भेट देण्याचे नियोजन करण्यात आले. सदर संस्थेस दिनांक १२ रोजी भेट देऊन तेथील व्यवस्थापक एन. आर. पाटील यांच्याकडून संस्थेच्या कार्य विषयक सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
उपस्थित विद्यार्थी व शिक्षकवृंदाना माहिती देतांना मानव सेवा तीर्थ चे व्यवस्थापक एन. आर. पाटील
माहिती देत असताना एन. आर. पाटील म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये राज्यातील विविध भागातील 132 मनोरुग्ण या ठिकाणी दाखल आहेत, यांची सेवा करणे व  योग्य औषधोपचार करणे इत्यादी कामे या ठिकाणी केली जातात. या मनोरुग्णांचा प्रवेश संस्थेमध्ये पोलिसांच्या मदतीने केला जातो. रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला इतरत्र भटकंती करणारे देखील मनोरुग्ण या ठिकाणी आहेत. या मनोरुग्णांना सांभाळताना अनेक समस्या येतात. एकमेकांमध्ये मारामारी करणे, संस्थेतून पळून जाण्याचे प्रयत्न करणे, औषधोपचार घेण्यासाठी प्रतिसाद न देणे, संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांवर देखील हल्ला करणे अशी कृत्य यांच्याकडून होत असतात. या सर्व समस्यांवर मात करून यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करून कौटुंबिक मायेने त्यांची सेवा केली जाते. त्यांची प्रकृती शारीरिक व मानसिकदृष्ट्या ठीक झाल्यावर त्यांच्याकडून त्यांची कौटुंबिक माहिती मिळाल्यावर त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले जाते.
क्षेत्रभेटी दरम्यान मानव सेवा तीर्थ येथे उपस्थित शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी
शिक्षणशास्त्र महाविद्यालयाकडून या सर्व मनोरुग्णांना फळ व बिस्किट स्वरूपात अल्पपोहार देण्यात आला. सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी 2100 रुपये रक्कम जमा करून संस्थेच्या कार्यात सहकार्य करण्यासाठी आर्थिक मदत दिली. या क्षेत्रभेटीसाठी महाविद्यालयाच्या आय. क्यू. ए. सी समितीचे सदस्य गोविंद गुजराथी, डी. टी. महाजन, प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे, समन्वयक प्रा . एन. डी. वाल्हे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. सविता जाधव, मुख्य लिपिक शरद पाटील व शिक्षकेतर कर्मचारीवृंदांचे सहकार्य लाभले .
Post Views: 596
Previous Post

पशुसंवर्धन शेतक-यांना महत्त्वाचा आधार होऊ शकतो – आमदार सुमीत वानखेडे

Next Post

चोरट्या वाळू वाहतुकीमुळे गावकऱ्यांचा पाणीपुरवठा होतोय वारंवार विस्कळीत 

Next Post
चोरट्या वाळू वाहतुकीमुळे गावकऱ्यांचा पाणीपुरवठा होतोय वारंवार विस्कळीत 

चोरट्या वाळू वाहतुकीमुळे गावकऱ्यांचा पाणीपुरवठा होतोय वारंवार विस्कळीत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us