टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 – जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो पेंट्स लिमिटेड आणि इंडिगो पेंटचे डीलर एसबी हार्डवेअर पुलगाव (हकीम बोहरा) यांच्या मार्फत श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इंडिगो पेंट सेवा उत्सव अंतर्गत पूलगाव येथील सर्व पेंटर असोसिएशनमधील बांधवांनी आपल्या श्रमदानाने देवळी तालुक्यातील पुलगाव नगरपरिषद येथील शहिद भगतसिंग प्राथमिक शाळा क्रमांक चार व चंद्रशेखर आजाद हिंदी प्राथमिक शाळा यांचे रंगरंगोटीचे कामं दिनांक 22 या दिवसाला पूर्ण झाले. सदर उपक्रम पेंटर असोसिएशन पुलगाव व इंडिगो पेंट लिमिटेड टीम यांच्यामार्फत संयुक्तरित्या राबविण्यात आला.
यामध्ये इंडिगो पेंट कंपनीचे ब्रांच मॅनेजर अभय मांडवगडे, एरिया सेल्स मॅनेजर जितेंद्र विरूळकर, एरिया सेल्स मॅनेजर नागराज शेलारे, अनमोल शुक्ला, अंकुश गर्लफट, नितीन खुरसंगे, अविनाश साठे, बाळासाहेब वाघमारे, प्रयास काले, प्रवीण गजभिये, धीरज रणदिवे, भूषण भैरम, निखिल सोनकूवर व अमित बांते आदींचा सहभाग होता.