टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 : रोटरी क्लब गांधी सिटीच्या वतीने स्वावलंबी मैदानावर सुरु असलेल्या रोटरी उत्सवास राज्याचे गृहनिर्माण (ग्रामिण), सहकार व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी भेट देऊन एवढया मोठ्या प्रमाणात रोटरी उत्सव आयोजित केल्याबद्दल रोटरी क्लब गांधी सिटी यांचे कौतुक केले.
जिल्ह्यातील नागरिकांना शहरात कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे साधन नाही. अशा स्थितीत रोटरी क्लबच्यावतीने गेल्या 14 वर्षापासुन वर्धा शहरात दरवर्षी रोटरी उत्सव साजरा करण्यात येतो. या रोटरी उत्सवाच्या माध्यमातुन नागरिकांना मनोरंजनासोबतच खाद्य वस्तू व इतर नवनवीन वस्तू विक्रीस उपलब्ध असल्याने यावेळी पंकज भोयर यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी सुनील गफाट, प्रदिप ठाकूर, रोटरी क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष विनोद सिन्नल, सचिव साकेत बागोडदिया, रोटरी उत्सव समितीचे अध्यक्ष साधना बन्नोरे, सचिव स्मिता व्यास व महेश मोकलकर आदिंसह इतर रोटरी सदस्यांची उपस्थित होते.