टिम लोकप्रवाह,चोपडा दि. 07 – केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घातली आहे. आरोग्याला घातक तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर काही वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. परंतु महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने “महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंच्या (उत्पादन, वापर विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८” संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यात आली आहे. या नियम व अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांची विक्री व खरेदी होत आहे. त्यामुळे सरकारने ठरवून दिलेल्या प्लास्टिक पिशव्यांबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.
प्लास्टिक बंदी करुन जनजागृती व दंड करुनही शहरात प्लास्टिक विक्री करणाऱ्यांसोबतचे प्लास्टिक वापरही वाढलेला आहे. याकरीता चोपडा नगरपरिषदेने आज दि.०७/०१/२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, मेनरोड परिसर इ. ठिकाणी भेटी देवून प्लास्टिक बंदी केलेले प्लास्टिक कोटींग असलेले डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इ. जप्त केले व एकूण र.रु.९०००/- दंड वसुल केला सदर कारवाई ही शिव समर्थ प्लास्टिक, प्रभाकर नेवे, गुरु खेतेश्वर स्विट, मिलाप स्टोअर्स, बँगलोर बेकरी, हरीओम खेतेश्वर, खेतेश्वर राजस्थान, प्रिया बेकरी इ. दुकानांवर करण्यात आली. तसेच त्यांना कारवाई दरम्यान कापडी पिशवी वापणेबाबत आवाहन करण्यात आले. प्लास्टिक बंदी व एकल वापर प्लास्टिक मोहिमेअंतर्गत चोपडा शहरातील विविध विक्रेता व पुरवठाधारक यांच्याकडे भेट देऊन प्लास्टिक वस्तू व कॅरीबॅग जप्त करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.
वरील कार्यवाही मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंके, जयेश भोंगे, व्हि. के. पाटील, लिपिक जयंत कपले, शहर समन्वयक स्वप्निल धनगर व मुकादम सुनिल बाविस्कर, किशोर पवार, रिंकु पवार व राहुल सैंदाणे आदींच्या पथकाने केली. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिला आहे.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 07 - केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लास्टिक...