Saturday, September 19, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा दृढनिश्चय करा – अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले

राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 8, 2025
in वर्धा जिल्हा, शासकीय
0
रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा दृढनिश्चय करा – अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 08 : वेगावर नियंत्रण मिळविण्याबरोबरच सुरक्षित प्रवास, वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन व नियम पालनाचा दृढनिश्चय हा संकल्प प्रत्येकाने केल्यास रस्ते अपघात कमी करण्यात आपण निश्चित यशस्वी होऊ असे, प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने न्यु आर्टस, कॉमर्स कॉलेज येथे दि. 1 ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाचे विभागीय अधिकारी श्री. उजवणे, प्राचार्य डॉ. सासनकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपअभियंता महेश मोकलकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान मनोगत व्यक्त करतांना अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले

लोकशाही मध्ये आपल्याला असलेल्या अधिकारा सोबतच इतरांना सुध्दा अधिकार आहे. त्यामुळे आपले हित जोपासन्यासोबतच इतरांचे सुध्दा हित जोपासणे महत्वाचे असून रस्त्यावर वाहन चालवितांना काळजीपुर्वक वाहन चालविणे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. वाहतुक नियमानुसार वाहन चालवून आपल्यासोबतच समाजाची काळजी घेणे महत्वाचे आहे, असे पुढे बोलतांना श्री. फुलझेले म्हणाले. आयुष्य हे अमुल्य आहे युवा ही देशाची ऊर्जा आहे ही ऊर्जा समाजाच्या कल्याणासाठी परावर्तीत करण्याचे ध्येय ठेऊन युवकांनी काम करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

आयुष्याचा प्रत्येक क्षण हा अमुल्य असतो. त्यामुळे वाहन चालवितांना वेगावर मर्यादा ठेवून वाहन चालवावे. समोरच्या वाहनाशी स्पर्धा करुन आपल्या सोबत दुर-यांचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी आजच्या युवा पिढींनी घ्यावी, असे आवाहन जितीन रहमान यांनी केले.

मानवी जीवन अमुल्य आहे. जीवनाचा आनंद घेण्यासाठी वाहन चालवितांना आपल्यासोबतच कुंटूंबांचा व इतर समाजाचा विचार करुन वाहतुकीच्या नियमांचा वापर करुन वाहन चालवावे. यासाठी वाहन चालवितांना मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, वाहनाच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवावे, दूचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहन हाताळण्यापुर्वी वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेऊनच वाहनाचा वापर करावा, असे अनुराग जैन म्हणाले.
स्नेहा मेढे यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यात मागील वर्षी 32 टक्के अपघात कमी झाल्याचे सांगून रस्ता अपघातात दोषी आढळल्या कारणाने 200 वाहन धारकांचे परवाने रद्द करण्यात असल्याची दिली. या कार्यक्रमात उपस्थितांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली.
सुरक्षित प्रवास, वेगावर नियंत्रण आणि नियमांचे पालन ही त्रिसूत्री प्रत्येकाने अंगिकारल्यास अपघातात होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी हातभार लागेल असे मत सतिश अंभोरे व विवेक देशमुख यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तत्पुर्वी वाहतुक नियमाच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

वाहतूक नियमाच्या पुस्तिकेचे लोकार्पण करतांना उपस्थित मान्यवर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा मेढे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक राहुल ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोटारवाहन निरिक्षक अजय चौधरी, संदीप मुखे, मेघल अनासाने, साधना कवळे, प्रफुल्ल मेश्राम, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अमर पखान, विशाल भगत, आदित्य ढोक, अक्षय मालवे, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कर्मचारी, न्यु आर्टस कॉलेज येथील विद्याथी, कर्मचारी, प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post Views: 354
Previous Post

चोपडा शहरात एकल वापर प्लास्टिक ग्लास व कप वापरण्यावर प्रतिबंध

Next Post

एचएमपीव्ही विषाणूला घाबरू नका, मात्र काळजी घ्या – जिल्हाधिकारी वान्मथी सी.

Next Post
एचएमपीव्ही विषाणूला घाबरू नका, मात्र काळजी घ्या – जिल्हाधिकारी वान्मथी सी.

एचएमपीव्ही विषाणूला घाबरू नका, मात्र काळजी घ्या - जिल्हाधिकारी वान्मथी सी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us