Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 6, 2025
in चोपडा, शैक्षणिक, सांस्कृतिक
0
प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 :  येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे दिमाखदार उद्घाटन आज दि. 6 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल यांच्या शुभहस्ते संस्थेचे ध्वजारोहण आणि एन सी सी च्या ९० कॅडेट यांनी  रोहन पाटील, श्रीमती जे आर बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकुमार मधुकर मगरे या विद्यार्थ्याच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करून संपन्न झाले. संस्थेच्या परंपरेप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा देखील सत्कार संस्थेच्या वतीने  करण्यात आला. यात एम आर पाटील, एम बी चौधरी, ए जी कुलकर्णी, पी पी पाटील, सुनील गुजराथी तसेच शिपाई अमृत पारधी यांचा सहपत्नीक तर दिवंगत तामराज सोनवणे व राजू पाटील यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिपप्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करतांना मान्यवर
             कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी शाळेच्या यशस्वी निकालाचा आढावा घेतला. वर्षभरात विविध वकृत्व, निबंध, कला, क्रीडा, विज्ञान, शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा त्यांनी गौरव केला. पी ए गुजराथी यांना रोटरी तर्फे नेशन बिल्डर अवार्ड , पी पी शिंदे यांना स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर व्ही ए गोसावी यांना उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, सौ. वाय ए बोरसे तसेच तुषार लोहार यांची कविता प्रसारित झाल्याबद्दल मुख्याध्यापकांनी गौरवोद्गार  काढले.
               यावेळी पुनम गजानन जाधव हिने राज्यस्तरीय हातोडा फेक स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविल्याबद्दल तिचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गावातील विभागाच्या विद्यार्थ्यांनी एन एन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नयनरम्य लेझीम प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी ४.०० वा इंग्लिश मिडियम स्कूल या विभागाचे ‘उडान’ या शीर्षकावरील रंगारंग असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. एनसीसी च्या उत्कृष्ट संचलनाबद्दल त्यांना योगेश मयूर यांनी दहा हजार तर लेझिम पथक व बँड पथक यांना डी टी महाजन यांनी दोन हजार रुपये देणगी म्हणुन बक्षीस दिले.
             यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल,  सचिव माधुरी मयूर, कार्यकारणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी, किरण गुजराथी, प्रविण गुजराथी, रमेशकाका जैन, योगी मयूर, मुख्याध्यापक प्रशांत गुजराथी , उपमुख्याध्यापक पी डी पाटील,  जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक एस एस पाटील, ए एन भट, सर्व आजी-माजी मुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व संस्थेच्या विविध ज्ञान शाखांचे पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी आणि लेखनिक कर्मचारी बंधू, समन्वयक गोविंद गुजराथी, डी टी महाजन, पालकवर्ग  आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             कार्यक्रमाचे ईशस्तवन पी. बी. कोळी, पंकज नागपुरे आणि त्यांच्या समूहाने सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज शेख आणि पंकज शिंदे यांनी पार पाडले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका माधुरी पाटील  यांनी केले.
Post Views: 494
Previous Post

निमगव्हाणला रासेयो शिबिराची सांगत, ७ दिवसांत गावात राबविले विविध उपक्रम

Next Post

चोपडा शहरात एकल वापर प्लास्टिक ग्लास व कप वापरण्यावर प्रतिबंध

Next Post
चोपडा शहरात एकल वापर प्लास्टिक ग्लास व कप वापरण्यावर प्रतिबंध

चोपडा शहरात एकल वापर प्लास्टिक ग्लास व कप वापरण्यावर प्रतिबंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us