टिम लोकप्रवाह, वर्धा, दि. 10 : शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल होत आहे. सर्वांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिक्षण प्रणालीतील सुधारणा बाबत शिक्षक व पालकांनी सूचना कराव्या, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण, गृह (ग्रामीण), सहकार, खनिकर्म व गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
शिक्षण विभाग पंचायत समिती वर्धाच्यावतीने बोरगांव मेघे येथील स्व. आनंदराव मेघे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन दिनांक 10 व 11 जानेवारी रोजी करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन आज शुक्रवारी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय भस्मे प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी प्रफुल लोखंडे गट शिक्षणाधिकारी डॉ. धर्मपाल कुमरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. परमार, माजी पंस सभापती महेश आगे,अजय वडतकर,शारदा तडस, नितीन डफळे, विजय ताजणे,श्री. राठोड, चरण चांभरे,श्रीमती कटाईत व मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्यमंत्री श्री. भोयर म्हणाले की, नवीन वर्षात नवे संकल्प घेऊन कार्य करतो. प्रत्येक व्यक्ती दैनदिन जिवनात समाजासाठी कार्य करीत असतो. शिक्षक सुद्धा भावी पिढी घडविण्याचे कार्य करतात. शाळेच्या माध्यमातून मुलांमध्ये अनेक चांगल्या गोष्टीचे महत्व पटवून देण्यासाठी नवीन आदर्शवादी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांचा प्रयत्न असतो. जिल्ह्यात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहे. मात्र या प्रणालीत काही अडचणी असू शकतात. त्या दूर करण्यासाठी व त्यामध्ये बदल घडविण्यासाठी आपण सूचना कराव्या. या सूचनांची दखल घेऊन शिक्षण विभागाच्या माध्यमातून बदल घडवू, असे ही श्री. भोयर म्हणाले.
शालेय स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडत असतात. अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देतात. विधार्थींनी स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आव्हान त्यांनी केले. मेघे विद्यालयाने शाळेत बैंड पथक व म्युजीक लॅबची मागणी केली. ही मागणी लवकरच पुर्ण केल्या जाईल. लॅबचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच गावातील विधार्थांना देखील व्हावा, असे ही श्री. भोयर म्हणाले.
प्रास्ताविकातून गट शिक्षणाधिकारी डॉ. कुमरे यांनी शालेय स्पर्धा प्रथम केंद्र स्तरावर व त्यांनतर बीट स्तरावर व नंतर तालुका स्तरावर होत असल्याचे माहिती देऊन तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणारे विधार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होत असल्याचे सांगितले. चांगले विधार्थी घडावे या या स्पर्धेमागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. राज्यमंत्री श्री. भोयर यांनी क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धेची सुरूवात केली. कार्यक्रमाला विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.