Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट-राठी ठरणार विदर्भातील पहिले ‘सौरग्राम’

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 11, 2025
in विदर्भ, वर्धा जिल्हा, वैशिष्ट्यपूर्ण, शासकीय
0
हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट-राठी ठरणार विदर्भातील पहिले ‘सौरग्राम’

टिम लोकप्रवाह, दि. 11 वर्धा : ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीला प्रत्यक्ष कृतीत आणून विदर्भातील पहिला शंभर टक्के ‘सौरग्राम’होण्याचा मान आता लवकरच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट-राठी या गावाला मिळणार आहे. सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणाऱ्या या गावाने शासकीय निधीची कुठलीही मदत न घेता ही किमया साध्य करणाऱ्या या गावाने संपुर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान 2 गावे 100 टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून या मोहिमेंअर्गत चिचघाट-राठी या गावाची निवड करण्यात आली असून गावातील सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे 811 किलोवॅट झाली आहे.

वर्धा शहरापासून 40 किमीच्या अंतरावर असलेले आणि महावितरणच्या हिंगणघाट (ग्रामीण) उपविभागा अंतर्गत असलेल्या चिचघाट-राठी या गावाचे हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते. मे हा अतिउष्णतेचा असल्याने सोबतच जवळपास वर्षभर असलेल्या स्वच्छ सुर्यप्रकाशाचा वापर करून वीज निर्मिती करणाच्या मानस करित येथील गावकऱ्यांनी महावितरणच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान सुर्यघर’ – मोफ़त वीज योजनेत सहभागी होत गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करुन एकजुटीने ‘सौर’उड्डाणाकडे यशस्वी प्रवास सुरु केला आहे.

गावामध्ये घरगुतीच्या 70, औद्योगिक 4, वाणिज्यीक 1, यासोबतच अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, पथदिवे आणि सार्वजनिक पाणी पुरवठा यासारख्या वीज जोडणी असलेल्या ग्राहकांनी छतावर सौर निर्मिती प्रकल्प उभारून पर्यावरणपूर्वक वीज निर्मिती सुरु केली आहे. घरगुती श्रेणीतील 70 ग्राहकांपैकी तब्बल 65 ग्राहकांनी स्वयंस्फ़ुर्तीने बॅंकेकडून कर्ज घेत, 2 ग्राहकांनी स्वखर्चाने तर उर्वरीत ग्राहकांना पी व्ही टेक्सटाईल्स या उद्योगाने दत्तक घेत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले आहे. बॅंकेकडुन कर्ज घेणाऱ्या 65 ग्राहकांपैकी तब्बल 50 ग्राहकांना बॅक ऑफ़ बडोदाने कर्जपुरवठा केला आहे.

पाहणी करतांना महावितरण चे अधिकारी

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री देवेंद्र फ़डणवीस, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, संचालक (संचालन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या निरंतर मार्गदर्शनात आणि प्रादेशिक संचालक, नागपूर परेश भागवत, कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) धनंजय औंढेकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती स्मिता पारखी यांच्या विशेष पुढाकाराने हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत तेलतुमडे, उपविभागिय अभियंता प्रविण तुरणकर, सहायक अभियंता अंकुश चहांदे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र उगे यांच्या अविरत प्रयासाने चिचघाट-राठी या गावाला विदर्भातील पहिले सौरग्राम होण्याचा बहुमान मिळाला आहे.

पाहणी करतांना महावितरणचे अधिकारी

चिचघाट-राठीच्या सरपंच श्रीमती सीमा बेवडे, माजी सरपंच श्री राजेश कोचर, उद्योगपती वरूण राठी आणि रितेश सुराणा, बॅक ऑफ़ बडोदाचे चेतन वंजारी आणि विनित विवेक महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पंकज फ़ाळे यांनी या गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरणासाठी विशेष प्रयत्न केले. गावकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे यासाठी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करणे, क्रिसील रेटींग़्ज खराब असलेल्यांना मदत करुन कर्ज मिळविण्यासाठी परिपुर्ण मदत करणारे, बॅकेकडे सातत्याने पाठपुरावा करणारे महावितरणच्या हिंगणघाट विभागिय कार्यालयातील उप व्यवस्थापक (वि व ले) विलास चतारे आणि उपविभागिय कार्यालयातील सहायक लेखापाल मयुर बिनोने, गावातील गृहिणींसोबत प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना सौर ऊर्जेचे महत्व समजावून सांगत त्यांना या योजनेत सहभागी होण्यास प्रवृत्त करणाऱ्या सहायक अभियंता कुमारी श्रीनिधी धुर्वे आणि श्रीमती निशिगंधा डवरे यांणि देखिल विशेष प्रयत्न केले. चिचघाट-राठी या गावाचा आदर्श घेत इतर गावांनी देखील त्यांचे गाव शंभर टक्के सौरग्राम करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Post Views: 487
Previous Post

शिक्षण प्रणाली सुधारणांबाबत शिक्षक व पालकांनी सूचना कराव्या – शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता प्रशासन सरसावले

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता प्रशासन सरसावले

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता प्रशासन सरसावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us