टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 – येथील पिपरी मेघे स्थित पिंक फिटनेस क्लब येथे जागतिक महिला दिन केक कापुन जल्लोषात साजरा करण्यात आला. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तव्याची जाण ठेवून स्वतःला सिद्ध करत आहे. पण या धकाधकीच्या दैनंदिनी जीवनात महिलांचे स्वतःच्या आरोग्यकडे दुर्लक्ष होते आणि नाईलाजाने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. या गोष्टीची जाणीव ठेवून फक्त महिलांसाठी “पिंक फिटनेस क्लब” ची स्थापना करण्यात आली.

या माध्यमातून पिंक फिटनेस क्लब महिला आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यवर्धक उपक्रम राबवित असते. नित्य योग व प्राणायाम, खेळी मेळीच्या वातावरणात झुंबा डान्स, मेडिटेशन, विविध प्रकारच्या व्यायाम उपकरण योग्य वापरासाठी प्रशिक्षण त्यासोबतच आहार नियोजन देवून आरोग्या समतोल साधण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन देण्यात येत असल्याची माहिती पिंक फिटनेस क्लबच्या संचालिका पुजा जोशी यांनी दिली.
सोबतच महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिलांना आरोग्याच्या बाबतीत सजग आणि सुदृढ राहण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आव्हान पुजा जोशी यांनी केले.
कार्यक्रमाला पिंक फिटनेस क्लब चे सर्व सदस्य
महिला भगिनी उपस्थित होत्या.