Saturday, August 1, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 18, 2025
in महाराष्ट्र, चोपडा
0
राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, मुंबई, दि.१८ : राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी ” बांधा वापरा हस्तांतरित करा ” या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे

विधानभवन येथे राज्य परिवहन विभागाच्या चोपडा आगारातील विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री श्री.सरनाईक बोलत होते. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, मुख्य लेखाधिकारी तथा आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख उपस्थित होते.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, शहर,तालुका व ग्रामीण भागातील परिवहन व्यवस्था बळकटीकरणासाठी ” बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक करण्यात यावे याबाबतीत स्थानिक आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या विनंतीवरून विधानभवनात परिवहन मंत्री श्री. प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेला आदिवासीबहुल तालुका म्हणून चोपडा तालुका ओळखला जातो तसेच राज्यस्तरावर आयोजित स्पर्धेत चोपडा आगाराला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले असल्याने एक महत्वाचे बसस्थानक म्हणून चोपडा बसस्थानकास अत्याधुनिक सोयीयुक्त बनविण्यात यावे अशी मागणी केली.

याबाबतीत लवकरच निविदा प्रक्रिया राबवून बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर चोपडा बसस्थानक विकसित करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यावेळी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा आगारासाठी ३० नवीन बसेसची मागणी केली यावेळी बोलताना मंत्री महोदयांनी लवकरच चोपडा आगारासाठी नवीन बसेस देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

Post Views: 686
Previous Post

पिंक फिटनेस क्लब येथे महिला दिन साजरा

Next Post

चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न

Next Post
चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न

चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us