Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

दिव्यांग गोपाल पवार यांचा वर्धा ते अयोध्या सायकल प्रवासाला उत्साहात शुभारंभ

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 1, 2025
in वर्धा जिल्हा, वैशिष्ट्यपूर्ण
0
दिव्यांग गोपाल पवार यांचा वर्धा ते अयोध्या सायकल प्रवासाला उत्साहात शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 01 (सचिन ओली) : दिव्यांग व्यक्तींमध्ये प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने केळझर येथील गोपाल बाबुराव पवार यांनी वर्धा ते अयोध्या असा तब्बल 900 किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू केला आहे. त्यांच्या या अद्वितीय उपक्रमासाठी लायन्स क्लब गांधी सिटी, बजरंग दल, प्रहार दिव्यांग संस्था यांनी आर्थिक मदत दिली. तसेच यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा त्यांना यावेळी पाठिंबा दर्शविला आहे.

या प्रवासाला हिरवी झेंडी दाखवितांना लायन्स क्लबचे अनिल नरेडी तसेच सोबत उपस्थित इतर मान्यवर

नारायण सेवा संस्थान उदयपूर, तसेच लायन्स क्लब गांधी सिटी यांनी घेतलेल्या कृत्रिम लिंब शिबिरामध्ये त्यांना हा कृत्रिम पाय बसवण्यात आला होता. तीनदा नॅशनल, एकदा इंटरनॅशनल, तसेच जिल्हास्तरीय अनेक स्पर्धेमध्ये गोपाल पवार यापूर्वी सहभागी झाले आहेत. याआधी त्यांनी केळझर ते शेगाव असा 350 किलोमीटरचा प्रवास सुद्धा केला आहे. त्यांनी दिनांक 31 जानेवारी रोजी वर्ध्यातील गांधी पुतळा येथून प्रस्थान केले.

याप्रसंगी लायन्स क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष आशिष पोहाणे, डायरेक्टर अनिल नरेडी, संदीप चिचाटे, चंद्रकांत डगवार, मनोज तेलहांडे, प्रमोद वाघ, राष्ट्रीय बजरंग दलचे विदर्भ प्रांतीय अध्यक्ष अनुप जैस्वाल, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनवणे व शिक्षण विस्तार अधिकारी जया परमार आदीसह इतर दिव्याग बांधव यांच्या उपस्थितीत या प्रवासाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यांच्या या उपक्रमाला संपूर्ण समाजाकडून शुभेच्छा दिल्या जात असून, ते यशस्वीरीत्या आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post Views: 337
Previous Post

शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी कला गुण जोपासावे –  मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान

Next Post

पिंक फिटनेस क्लब येथे महिला दिन साजरा

Next Post
पिंक फिटनेस क्लब येथे महिला दिन साजरा

पिंक फिटनेस क्लब येथे महिला दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us