Friday, December 5, 2025
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आठ हजाराची लाच घेतांना वनपाल अटकेत

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 2, 2025
in क्राईम, जळगांळ जिल्हा, पोलीस डायरी
0
५००० रुपयाची लाच घेतांना लाचखोर ग्रामसेवकास रंगेहात अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, जळगांव दि. 02 जुलै – शेतात लागवड करण्यात आलेली सागाची झाडें तोडण्याची परवानगी मिळणेसाठी पारोळा वनपरीक्षेत्र कार्यालयातील वनपाल  दिलीप भाईदास पाटील वय 52 मोडाळा, ता. पारोळा रा. देवपूर धुळे यांनी तक्रारदारांकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली. व सदर लाचेची रक्कम वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड वय 38, व्यवसाय वनपाल, चोरवड , ता. पारोळा, रा.पारोळा जि. जळगांव यांनी स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची शेतमालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात. तक्रारदार यांनी पारोळा तालुक्यातील इंधवे येथील शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सागाचे झाडे तोडण्याचा शेतकरी व तक्रारदार यांच्यात साठ हजार रुपयांचा सौदा झालेला होता‌. त्यानुसार सदर शेतकरी यांनी उपवन विभाग पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले होते. त्यानुसार सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी वनपाल दिलीप भाईदास पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्याबाबतीत तक्रारदार यांनी दि.19/06/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने पडताळणी केली असता वनपाल दिलीप भाईदास पाटील याने 8000 ची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून आज दिनांक 02/07/2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून वनपाल दिलीप भाईदास पाटील यांचे सांगणे वरून वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड यांनी पंचासमक्ष 8000/-रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत. वनपाल दिलीप भाईदास पाटील व वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले असून मोबाईल जप्त करण्यात आले आहे. तसेच वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्र अधि . 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदर कारवाई ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक भारत तांगडे व अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सफौ सुरेश पाटील, मपोहेकॉ शैला धनगर, पोहेकॉ किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने व अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

Post Views: 309
Previous Post

रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Next Post

अवैद्यरीत्या विना परवाना विदेशी व गावठी मोहा दारुची वाहतुक करणारा जेरबंद

Next Post
अवैद्यरीत्या विना परवाना विदेशी व गावठी मोहा दारुची वाहतुक करणारा जेरबंद

अवैद्यरीत्या विना परवाना विदेशी व गावठी मोहा दारुची वाहतुक करणारा जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

शहरात आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश

शहरात आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश

by टीम लोकप्रवाह
December 3, 2025
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

by टीम लोकप्रवाह
September 13, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 -- मा. उच्च न्यायालय, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये आज...

ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची घुसखोरी थांबवा!!

ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची घुसखोरी थांबवा!!

by टीम लोकप्रवाह
September 9, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 09 - आंदोलनाच्या झुंडशाहीला बळी पडून शासनाने हैदराबाद गॅझेटिअरबाबत काढलेला शासन निर्णय (जीआर) हा पूर्णपणे असंवैधानिक...

अवैद्य जुगार अड्डयावर पुलगाव पोलिसांची धाड; डीवायएसपी डॉ. वंदना कारखेले यांच्या पथकाची कारवाई 

अवैद्य जुगार अड्डयावर पुलगाव पोलिसांची धाड; डीवायएसपी डॉ. वंदना कारखेले यांच्या पथकाची कारवाई 

by टीम लोकप्रवाह
August 31, 2025
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 30 - जिल्ह्यातील पुलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी...

नागलवाडी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प संपन्न!!

नागलवाडी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प संपन्न!!

by टीम लोकप्रवाह
August 30, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 - तालुक्यातील नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प गुंफण्यात आले. सर्वप्रथम पू....

डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 

डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 

by टीम लोकप्रवाह
August 30, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 - येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालयातील पीजी डिपार्टमेंट ऑफ...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us