टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 02 : रामनगर ठाणे अंतर्गत येत असलेल्या उमरी मेघे येथील विदेशी व गावठी दारू पकडून एकास ताब्यात घेतले. दारूबंदी जिल्ह्यात तब्बल साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये इंग्लिश, गावठी व मोहा दारुसह चारचाकी वाहनाचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस निरीक्षक अजय भुसारी व दारू बंदी पथक अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वृंदावन नगर, शांती नगर वर्धा येथे नाकेबंदी करून सापळा रचला असता आरोपी नामे शुभम उर्फ प्रतीक विनोदराव सावळे वय 25 वर्षं रा. तीगाव आमला ता.जि. वर्धा याची तपासणी केली असता त्याच्याजवळ अवैद्यरित्या विनापास परवाना विदेशी व गावठी मोह दारु मिळून आली, त्यांचेकडून तब्बल 4,25,900/- रु. चा माल मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

त्यामध्ये 180 एम.एल.च्या ओ सी ब्ल्यू कंपनीच्या सिलबंद 06 शिश्या प्रती नग 350/- रु. प्रमाणे 2100/- रु., 180 ML च्या विदेशी ऑफिसर चॉईस कंपनीची 18 सिलबंद दारुच्या शिश्या प्रती नग 300/- रु. प्रमाणे 5400/- , तीन प्लास्टिक डबकीत प्रति डबकी 28 लिटर प्रमाणे एकूण 84 लिटर गावठी मोह दारू प्रति लिटर 200/- रु. प्रमाणे की. 16,800/-, तीन प्लास्टिक डबकी किंमत प्रति डबकी 200/- प्रमाणे 600/- रुपये, एक सिल्वर रंगाची होंडा कंपनीची होंडा सिटी गाडी किंमत 4,00,000/- असा एकुण जुमला किमंत 4,24,900/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत विनापास परवाना दारू वाहतुक करताना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द कलम 65 (अ),(ई),77(अ) म.दा.का. सहकलम 3(1),181,139/177 मो.वा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली व रामनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांचे निर्देशाप्रमाणे दारूबंदी पथकचे बंडू महाकाळकर, मुकेश वांदिले, विकी अणेराव व मनोज भोमले आदींनी केली.









