टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 23 – स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी दि चोपडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, चोपडा यांच्या वतीने गो ग्रीन या नाशिकस्थित कॅब कंपनीला ३९ प्रदूषणमुक्त वाहनांसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा पुणे येथे नुकताच पार पडला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, गो ग्रीनचे मालक क्षमिक शाह आणि बँकेचे डिरेक्ट सेलिंग एजंट (DSA) प्रेम अडवाणी उपस्थित होते.
उदघाटनप्रसंगी कॅबचे पूजन करतांना बँकेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी
या उद्घाटनप्रसंगी बोलताना चंद्रहास गुजराथी म्हणाले, “समाजातील सकारात्मक बदल घडवणाऱ्या आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या उपक्रमांना आर्थिक मदत देणे हा आमच्या बँकेचा नेहमीच एक उद्देश राहिला आहे. ‘गो ग्रीन’ चा हा पुढाकार आणि आमचा सहभाग हरित भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पहिल्या टप्प्यात ३९ कॅबचे वितरण करताना मला व संचालक मंडळाला मनस्वी आनंद होत आहे.
कॅब उदघाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर
क्षमिक शाह यांनी बँकेच्या सहकार्याबद्दल आभार मानत सांगितले, “या आर्थिक मदतीमुळे आम्हाला आमचा प्रदूषणमुक्त कॅब ताफा विस्तारता येणार असून नाशिक, पुणे आणि मुंबई मधील नागरिकांना पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीची सेवा देता येईल. हरित पर्याय ही काळाची गरज आहे. आम्हाला गो ग्रीन च्या माध्यमातून सुमारे १५० कॅब चा ताफा उभारण्याचा संकल्प आहे.
प्रेम अडवाणी यांनी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले, “हरित तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि बँकिंग क्षेत्रातील सकारात्मक सहभागामुळे समाजात परिवर्तन घडत आहे. अशा उपक्रमांमुळे सहकार बँका आणि नवउद्योजक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल.”
या अर्थसहाय्यामुळे ‘गो ग्रीन’ कॅब कंपनीकडील नवीन प्रदूषणमुक्त वाहने लवकरच नाशिक, पुणे आणि मुंबई शहरातील विविध मार्गांवर कार्यरत होतील, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन नागरिकांना स्वच्छ वाहतुकीचा लाभ मिळणार आहे. हा उपक्रम सहकार क्षेत्र व हरित उपक्रमांतील भागीदारीचे आदर्श उदाहरण ठरत आहे.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...