टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 – पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभाग व विवेकानंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “क्वांटम युगाची सुरवात, संभाव्यता व आव्हाने” या विषयावरील अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी विवेकानंद विद्यालय, चोपडा येथे संपन्न झाला. चोपडा तालुक्यातील एकूण 16 शाळांनी या विज्ञान मेळाव्यात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे होत्या. बालवैज्ञानिकांना “क्वांटम युगाची सुरवात-संभाव्यता व आव्हाने” याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील (हातेड), संजय हरी पाटील(कोळंबा)व विजय पालीवाल (वडती) यांनी कामकाज पाहिले.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी अजित पाटील व राजमल महाजन, केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, देवेंद्र पाटील, सुनील मेश्राम, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, व्ही. आर पाटील, तालुका विज्ञान मंच अध्यक्ष भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील , उपाध्यक्ष संजय हरी पाटील, सहसचिव निलेश पाटील, सदस्य किशोर पाटील व श्रीमती एस. एम. चौधरी आदिसह तालुक्यातील इतर विज्ञान शिक्षक आदींची उपस्थिती होती.
या विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी पायल नरेंद्र पाटील हिने पटकावला तर द्वितीय क्रमांक विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थी नक्षत्र बाळकृष्ण कापुरे पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
तर तृतीय क्रमांक पंकज विद्यालयातील आयुष किरण पाटील व उत्तेजनार्थ प्रताप विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थी शिवराज अनिल पाटील यांनी पटकावला. कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षक म्हणून विजय पालिवाल यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधून नक्षत्र कापुरे व सोनल साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील व आभार भूपेंद्र पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प. स. चोपडाचे प्रशांत सोनवणे, सरला शिंदे, विजय पाटील, पवन पाटील, वैशाली पाटील, सारिका बाविस्कर व शिक्षण विभाग, चोपडा व विज्ञान मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 416








