Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

कै. हि. मो. करोडपती विद्यालयात त्रिशा फॉउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वितरण

डॉ सतीश बेहडे व परिवाराचा स्तुत्य उपक्रम

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 12, 2025
in चोपडा, शैक्षणिक, सामाजिक
0
कै. हि. मो. करोडपती विद्यालयात त्रिशा फॉउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वितरण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 12 – येथील कै. हि. मो. करोडपती माध्यमिक विद्यालयात त्रिशा फॉउंडेशन, चोपडा तर्फे गरीब, होतकरू व आदिवासी विद्यार्थ्यांना डॉ. कल्पेश बेहडे, डॉ. प्रियंका बेहडे व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना नोटबुक, रंगपेटी, दप्तर आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले तसेच यावेळी इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी च्या किशोरवयीन मुलींना सॅनेटरी पॅड नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा आनंद व्यक्त करतांना विद्यार्थी
           चोपडे शहरात गेल्या 45 वर्षांपासून दंतरोग चिकित्सक म्हणून सेवा देत असलेले, त्रिशा फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश बेहडे यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून व संकल्पनेतून शहरातील गरीब व होतकरू विद्यार्थांना विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. त्यानुसार विद्यालयातील आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदत व्हावी व प्रोत्साहन मिळावे. या उदात्त हेतूने परिवारातील सदस्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले.
साहित्य वितरणाप्रसंगी विध्यार्थ्यांसमवेत त्रिशा फौंडेशन पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद
          याप्रसंगी मुख्याध्यापक मंगेश भोईटे यांनी संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने या उपक्रमाबद्दल आभार मानले. याप्रसंगी आर. आर. बडगुजर, ए. पी. बडगुजर, श्रीमती सी. पी. बडगुजर, श्रीमती व्ही. बी. साळुंखे, श्रीमती पी. सी. बडगुजर, श्रीमती एस. टी. बोरसे, शर्मिला बडगुजर, संजोग साळुंखे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक बडगुजर, सुनील बडगुजर यांनी सहकार्य केले.
Post Views: 441
Previous Post

चोपड्यात तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

सत्रासेन आश्रमशाळेत ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!! 

Next Post
सत्रासेन आश्रमशाळेत ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!! 

सत्रासेन आश्रमशाळेत ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us