टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 – आपल्या देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिम्मित सत्रासेन येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भादले यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत यांच्या गजरात तिरंग्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर इतर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच यशप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सत्रासेन ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच व माध्य. विभागाच्या मुख्याध्यापिका वंदना ज्ञानेश्वर भादले व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जगदीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले, उपाध्यक्ष धनंजय भादले तसेच सर्व संचालक मंडळातील सदस्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर
याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या प्रसंगी ग्रामस्थ-पालक मेळावा घेण्यात आला. विविध परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता, नाटिका आणि भाषणे सादर केलीत.
यावेळी शिक्षिका दिपमाला भादले, प्राथमिक विभागातील उदय वानखेडे, विकास कोळी, पवनकुमार पावरा, अनिल राणे, मनोज साळुंखे, कल्पना पाटील, मनिषा जाधव, विकास पाटील, अजय पावरा, सरोजिनी चौधरी, सुधाकर महाजन, वैशाली अजगे, माध्यमिक विभागातील कैलास महाजन, प्रकाश महाजन, संजय शिरसाळे, अधिक भादले तसेच उच्च माध्यमिक विभागातील भालचंद्र पवार, मनोज पाटील, योगेश पाटील, झुलाल करंकाळ, नरेंद्र देसले, गजानन पाटील, परमवीर भादले, दिलीप बाविस्कर, नरेंद्र महाजन, शितल पाटील, मनोज महाजन, रामलाल अवाया, सुशिला पावरा, सुनिल भादले, विजय सैदाणे, विनोद महाजन, पंकज नहाले, आक्काबाई भादले, हिरालाल अवाया, पन्नालाल जोशी आदींची उपस्थिती होती.
ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी तर आभारप्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...