टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 30 – जिल्ह्यातील पुलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी पथकासह अवैध जुगार अड्डयावर धाड टाकली असता तेथे जुगार खेळणाऱ्या सर्व जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडूल बावनताश पत्ते, मोबईल फोन, नगदी रोख, चार चाकी वाहन 04 व दुचाकी वाहन 01असा तब्बल 75 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे सदर आरोपिंवर पुलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी व जप्त मुद्देमालसह उपस्थित dysp डॉ. वंदना कारखेले सह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका ठिकाणी अवैध जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी पथकाच्या मदतीने त्याठिकाणी धाड टाकली असता आरोपी यांचे ताब्यातुन बावनताश पत्ते, मोबईल फोन, नगदी रोख, चार चाकी वाहन 04 व दुचाकी वाहन 01 असा एकुण जुमला किंमत 74,08,180/- रू मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमाल पंचनामा करून जप्त करून 718/25 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपिंना अटक करण्यात आली आहे.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...